तुम्ही नेमके कुणाच्या बाजूने आहात? नितीशकुमारांच्या संतापाचा झाला स्फोट

बिहारमधील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याची टीका होत असतानाच इंडिगो कंपनीच्या व्यवस्थापकाच्या हत्येवरुन राज्यातील वातावरण तापले आहे.
bihar cm nitish kumar slams media over indigo manager killing
bihar cm nitish kumar slams media over indigo manager killing

पाटणा : इंडिगो कंपनीचे विमानतळ व्यवस्थापक रुपेशकुमारसिंह यांच्या हत्येने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री निवासापासून थोड्याच अंतरावर झालेल्या या हत्येने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षांसह सहकारी पक्ष भाजपकडून टीकेचे धनी बनलेले मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संतापाचा आज स्फोट झाला.  

पाटणा विमानतळावरून १२ जानेवारीला कामावरून घरी परतताना रूपेशसिंह यांची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या अपार्टमेंटसमोरच त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. मुख्यमंत्री, राज्यपाल आदींचे निवासस्थान तेथून अवघ्या दोन किलोमीटरवर अंतरावर आहे. सिंह हे अनेक बडे राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांच्या हत्येवरुन राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. या हत्येवरुन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विरोधी पक्षांसोबत सत्तेत सहभागी असलेल्या भाजपकडूनही उपस्थित केला जात आहे. 

आज या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार आज संतापले. या हत्या प्रकरणाचा उलगडा करुन दाखवा, असे खुले आव्हानही त्यांनी माध्यमांना दिले. ते म्हणाले की, तुम्ही चुकीटे आणि अयोग्य प्रश्न विचारत आहात. तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्ही ती पोलिसांना द्या. तुम्ही महान आहात. तुम्ही नेमका कुणाला पाठिंबा देत आहात. मी थेटपणे तुम्हाला विचारत आहे. 

पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या पती-पत्नीच्या काळात मोठी गुन्हेगारी होती. यावर तुम्ही का लक्ष देत नाही. काहीही घडले तरी आमची कारवाई सुरूच आहे. मी तुमचा आदर करतो परंतु, तुम्हाला सल्ला देणाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. 

मागील काही काळापासून भाजपने नितीशकुमार यांच्याकडे असलेले गृह खाते काढून घेण्यासाठी दबावतंत्र सुरू केले आहे. अरुणाचल प्रदेशमधील आमदार भाजपने फोडल्याने जेडीयूमध्ये तीव्र नाराजी आहे. असे असतानाही भाजपकडून कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे गृह, सामान्य प्रशासन, दक्षता आणि सर्वसाधारण प्रशासन या खात्यांचा कार्यभार आहे. भाजपने गृह खाते मागण्यास सुरवात केली असून, यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com