Nitish Kumar News : देशातील मीडियाने मोदींपासून स्वतंत्र व्हावे ; नितीश कुमारांचे माध्यमांना आवाहन

India alliance meet : मोदींचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.
Nitish Kumar
Nitish Kumarsarkarnama

Mumbai News : "देशात सत्तेत असणारे आता हारणार असून घरी जाणार आहेत," असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी "देशातील मीडियाने मोदींपासून स्वतंत्र व्हावे," अशा शब्दात माध्यमांच्या प्रतिनिधींना चिमटा काढला. "मोदी काम कमी करतात, पण त्यांना खूप प्रसिद्धी मिळते. पण इंडिया आघाडीबाबत तुम्हाला जे वाटते ते लिहा. तुम्हाला स्वातंत्र आहे," असे नितीश कुमार म्हणाले.

Nitish Kumar
Hemant Soren News : मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ ; हेमंत सोरेन यांना तिसऱ्यांदा समन्स; चौकशीला हजर राहण्याचा ईडीचा आदेश

इंडिया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीचा आज समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. "इंडिया आघाडीचे पक्ष आता देशभर जाऊन आमचे विचार मांडणार आहोत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोदींचा पराभव निश्चित आहे. मोदींचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे," असे आवाहन नितीश कुमार यांनी केले.

Nitish Kumar
Eknath Shinde News : पक्ष सांभाळू शकले नाहीत, ते आघाडी काय सांभाळणार ? मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

"इंडिया आघाडीची लढा हा महागाईच्या विरोधातील लढा आहे. मोदी हे कधीही गरिबांसाठी काम करीत नाही. महागाईच्या विरोधात लढणे हाच इंडिया आघाडीचा उद्देश आहे," असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. "मणिपूर जळत असताना तु्म्ही विशेष अधिवेशन बोलावले नाही, देश जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तुम्ही अधिवेशन का बोलवले नाही," असा सवाल खर्गे यांनी केला आहे.

"सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेल्या पक्षांवर तपास यंत्रणांकडून गैरवापर होत आहे. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे, ते घाबरविण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही त्यांना घाबरणार नाही, असे खर्गे म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in