राजकारण तापलं; मुख्यमंत्र्यांचे आमदारांना 72 तास राजधानीतच थांबण्याचे आदेश

राज्यसभा निवडणूक तसेच जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून बिहारमधील राजकारण तापू लागलं आहे.
CM Nitish Kumar
CM Nitish KumarSarkarnama

पाटणा : बिहारमध्ये (Bihar) राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना राजधानी पाटणातच थांबण्याचे आदेश दिले आहेत. पुढील 72 तास पाटणातून बाहेर जाऊ नये, असा निरोप सर्व आमदारांना देण्यात आला आहे. राज्यसभा निवडणूक तसेच जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून बिहारमधील राजकारण तापू लागलं आहे. जनगणनेच्या मुद्यावरही विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) व मुख्यमंत्र्यांचीही जवळीक वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढल्याचीही चर्चा आहे. (CM Nitish Kumar Latest Marathi News)

राज्यसभा निवडणुकीआधी बिहारमध्ये राजकीय बदलाचे संकेत मिळत आहेत. नितीशकुमार हे संयुक्त जनता दलाचे (JDU) अध्यक्ष व केंद्रीय मंत्री आर. सी. पी. सिंह यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवू इच्छित नाहीत. तर दुसरीकडे सिंह हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे सिंह यांचा पत्ता कट झाल्यास पक्षात फूट पडू शकते, अशी चर्चा रंगली आहे.

CM Nitish Kumar
राज ठाकरेंचं भाषण वैचारिक, खिल्ली उडवू नका! भास्कर जाधवांच्या मनात काय चाललंय?

बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेच्या वारे वाहत आहे. या मुद्दयावरून नितीशकुमार आणि यादवांची जवळीक वाढली आहे. दोघांची नुकतीच भेटही झाली होती. या भेटीनंतर काही दिवसांतच माजी मुख्यमंत्री व आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या घरांवर सीबीआयचे छापे पडले होते. यामध्ये भाजपचाच हात असल्याचा दावा आरजेडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

भाजपचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. त्यावरूनही जेडीयू आणि भाजपमध्ये दुरावा वाढत असल्याची चर्चा आहे. नितीशकुमार यांच्याकडून येत्या 27 मे रोजी सर्वपक्षांची बैठक बोलावली आहे. त्यांनी काही पक्षांशी चर्चा केली आहे. ही बैठक झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये प्रस्ताव सादर केला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष जनगणनेला सुरूवात होणार आहे.

मुख्यमंत्री जाणार राजगीरला

नितीशकुमार हे मंगळवारी राजगीरला जाणार आहेत. जाणकारांकडून सांगितले जाते की, नितीशकुमार राजगीर दौऱ्यावर गेल्यानंतर राजकीय भूकंप होतो. वर्ष 2017 मध्ये ते महाआघाडीतून बाहेर पडणार होते. त्याआधी ते राजगीरला गेले होते. तिथून आल्यानंतरच त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com