लालूंना शिक्षा होताच नितीश कुमारांनी २६ वर्षांनी दिली कबुली; म्हणाले...

लालू प्रसाद यादव यांना पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणात पाच वर्षांचा कारावास आणि ६० लाख रूपयांचा दंड अशी शिक्षा सोमवारी सुनावली आहे.
lalu prasad yadav- Nitish kumar
lalu prasad yadav- Nitish kumar Sarkarnama

पाटणा : बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणात (fodder scam) पाच वर्षांचा कारावास आणि ६० लाख रूपयांचा दंड अशी शिक्षा सोमवारी (ता. २१) सुनावली आहे. ही शिक्षा सुनावताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २६ वर्षांनी एका गोष्टीची कबुली दिली आहे.

यादव यांना शिक्षा सुनावल्यानंतर माध्यमांनी नितीश कुमार (Nitish Kumar) यांना त्याबाबत विचारणा केली. त्यावर बोलताना नितीश कुमार म्हणाले, या प्रकरणात १९९६ मध्ये जेव्हा जनहित याचिका दाखल केली जाणार होती, त्यावेळी मी याचिकाकर्ता बनण्यास नकार दिला होता. मी केस केली नव्हती, ना काही केले आहे. अनेक प्रकरणे दाखल करणारे आता लालू प्रसाद यादव यांच्यासोबत आहेत. काही लोक इकडंही आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

lalu prasad yadav- Nitish kumar
राजनाथसिंहांवर प्रचार सभेतच नामुष्की; होगी, होगी...म्हणत वेळ मारून नेली!

नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, लालू प्रसाद यांच्याशी संबंध तोडून जे आमच्याकडे आले ते पुन्हा लालुंकडे गेले आहेत. तेही या प्रकरणात याचिकाकर्ते होते, असं ते म्हणाले. लालूंच्या शिक्षेवर बोलताना मात्र त्यांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलं.

दरम्यान, पशूखाद्य गैरव्यवहारातील सर्वांत मोठ्या डोरंडा कोशागार गैरव्यवहारात लालू प्रसाद यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोषी जाहीर केले होते. झारखंडमधील डोरंडा कोषागरातून १९९६ मध्ये १३९.३५ कोटी रुपये अवैधरीत्या काढल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

पशूखाद्य गैरव्यवहारात चाईबासा कोशागारसंबंधी दोन, देवघर व डुमका कोशागारशी संबंधित चार प्रकरणात लालू प्रसाद यांना १४ वर्षांची शिक्षा आधीच सुनावण्यात आलेली आहे. यादव हे सध्या एम्स रुग्णालयात आहेत. तेथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते सुनावणीला हजर होते. अन्य दोषी होटवार रुग्णालयातून उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com