भाजपच्या ‘एनडीए’ मध्ये आमची घुसमट होतेय : माजी मुख्यमंत्र्यांनी टाकला बॉम्ब

Bihar | NDA | : एनडीएकडून मात्र माजी मुख्यमंत्र्यांची खिल्ली
भाजपच्या ‘एनडीए’ मध्ये आमची घुसमट होतेय : माजी मुख्यमंत्र्यांनी टाकला बॉम्ब
Narendra Modi, Amit Shah, J.P. Naddasarkarnama

(Bihar | NDA | latest news)

पाटणा : भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये (NDA) भागीदार म्हणून आमची घुसमट होत आहे, अशी खंत बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी व्यक्त केली. शिवाय बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून २०१५ मध्ये वर्षभरातच पायउतार झाल्याबद्दलही त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला. मांझी हे हिंदुस्थान आवाम मोर्चाचे संस्थापक असून बिहार विधानसभेत त्यांच्या पक्षाचे ४ आमदार आहेत. ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. (Bihar | NDA | latest news)

या बैठकीत भाजपच्या सध्याच्या धोरणांवर टीका करण्यात आली. तसेच, देशातील धार्मिक तणावावरही चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे बिहारमधील आगामी विधानपरिषद निवडणुकीत एनडीएतील ‘मोठ्या भागीदारांनी पाठिंबा देण्याची विनंती केल्यानंतर आपण आपल्या पक्षाचे अस्तित्व जाणवून देऊ शकतो, असा विश्वासही मांझी यांनी बोलताना व्यक्त केला. सध्या मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात असून तेच हिंदुस्थान आवाम मोर्चा या पक्षाचेही अध्यक्ष आहेत.

दरम्यान, जीतनराम मांझी यांनी एनडीएवर आणखी एक आक्षेपार्ह आरोप केला असला तरी बिहारमधील सत्ताधारी एनडीए आघाडीकडून त्यांच्या विधानाला फारसे महत्त्व दिले जाणार नाही, असे म्हणतं एनडीएतील नेत्यांनी जीतनराम मांझी यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली आहे.

१९८० पासून राजकारणात असलेल्या मांझी यांनी बिहारच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. मात्र, नितीशकुमार यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील संयुक्त जनता दलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर मांझी मुख्यमंत्री झाले होते. मात्र, त्यानंतर नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री बनले होते. बिहारमधील मद्यविक्रीपासून धर्मापर्यंतच्या विषयांवर आपली मते मांडणाऱ्या मांझी यांनी आपल्याला कधीही गांभीर्याने घेतली जात नसल्याची खंतही यापूर्वी अनेकदा व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in