भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणतात, रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळेना अन् डॉक्टरही फोन उचलेनात

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, बिहारमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढू लागला आहे.
bihar bjp chief sanjay jaiswal says health system is worsening due to covid
bihar bjp chief sanjay jaiswal says health system is worsening due to covid

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, बिहारमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. बिहारमध्ये रुग्णांना उपचारासाठी रुग्णालये अपुरी पडत असून, ऑक्सिजनही मिळत नसल्याचे चित्र आहे. अखेर भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष व खासदार संजय जयस्वाल यांनी सोशल मीडियावर राज्यातील ही विदारक स्थिती मांडली आहे. 

बिहारचे मुख्य सचिव अरुणकुमारसिंह यांचा काल (30 एप्रिल) आणि आमदार हरिनारायण चौधरी यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असणाऱ्या 11 राज्यांमध्ये बिहारचा समावेश आहे. या 11  राज्यांत एकूण सक्रिय रुग्णांपैकी 78.18 टक्के रुग्ण आहेत. महिनाभरापूर्वी बिहारमध्ये कोरोनाचे 2 हजार रुग्ण होते. आता राज्यात एकूण सुमारे 1 लाख कोरोना रुग्ण आहेत. 

या पार्श्वभूमीवर स्वत: डॉक्टर असलेल्या संजय जयस्वाल यांनी म्हटले आहे की, राज्यातील परिस्थिती एवढी बिघडली आहे की माझे जवळचे मित्र असलेले डॉक्टर फोन उचलत नाहीत. कारण ते मला कोणतीही मदत करु शकत नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माझ्या जवळचे अनेक जण हिरावले गेले आहेत. 

जयस्वाल हे चंपारण मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, बेड आणि ऑक्सिजनची नव्याने व्यवस्था करुनही ते अपुरे पडत आहेत. आणखी बेड वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु, एवढे करुनही ते पुरेसे पडतील असे मला वाटत नुाही. राज्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर 30 टक्क्यांवर पोचला आहे. 

कोरोनावर सर्वाधिक उत्तम उपचार म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणे हा आहे. परंतु, दुर्दैवाने लोकांना या जिवघेण्या विषाणूची दाहकता समजलेली नाही. लोकांनी हे गांभीर्य समजून घेऊन लवकरात लवकर कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन करायला हवे, असे जयस्वाल यांनी नमूद केले आहे. 

देशात 24 तासांत 4 लाख रुग्ण 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 4 लाख 1 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. जगामध्ये भारतात सर्वाधिक रुग्ण एकाच दिवसांत सापडण्याचा उच्चांक नोंदवला गेला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 146 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. मागील 24 तासांत देशात 3 हजार 523 मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातील असून, 828 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ दिल्ली 375, उत्तर प्रदेश 332, छत्तीसगड 269, कर्नाटक 217, गुजरात 173, राजस्थान 155, उत्तराखंड 122, झारखंड 120, पंजाब 113 आणि तमिळनाडूतील 113 मृत्यूंचा समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com