Bihar Assembly Ruckus bjp rjd ladoo lalu rabri misa bail
Bihar Assembly Ruckus bjp rjd ladoo lalu rabri misa bailSarkarnama

Video: विधानसभेत आमदारांमध्ये राडा ; भाजपच्या आमदारांना मिठाई देण्याचा..

Bihar Assembly Ruckus bjp rjd ladoo lalu rabri misa bail : राजद आणि भाजपच्या आमदारांमध्ये राडा झाला.

Bihar Assembly Ruckus bjp rjd ladoo lalu rabri misa bail : जमीनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष, माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाने आज (बुधवारी) जामीन मंजूर केला आहे.

लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळाल्यानंतर राजपच्या कार्यकर्त्यांनी आंनदोत्सव साजरा केला. यावेळी बिहार विधानसभेत राजद आणि भाजपच्या आमदारांमध्ये राडा झाला.

लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळाल्यानंतर राजदच्या आमदारांनी विधानसभेत भाजपच्या आमदारांना मिठाई देण्याचा प्रयत्न केला. यावरुन राजद-भाजप आमदारांमध्ये बाचाबाची झाली. भाजपचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी लालू प्रसाद यादव यांना मिळालेल्या जामीनावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.

या गोंधळानंतर विरोधीपक्षनेते विजय कुमार म्हणाले, "राजदचे आमदार गुंडागर्दी करीत आहेत. मिठाई वाटण्याच्या बहाण्याने भाजप आमदारांना धक्काबुक्की करीत आहेत. राजदचे आमदार भाजपच्या आमदारांना त्रास देत आहेत. याप्रकरणी आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत,

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्ली न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. लालू यांच्यासह त्यांच्या पत्नी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabari Devi), कन्या मीसा भारती यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या तिघांनी आज दिल्ली न्यायालयात हजेरी लावली होती. व्हिलचेअरवरुन ७४ वर्षीय लालू प्रसाद यादव हे न्यायालयातआले होते.

Bihar Assembly Ruckus bjp rjd ladoo lalu rabri misa bail
Lalu Prasad Yadav News: चौदा वर्षांपूर्वीच्या खटल्यात लालू प्रसाद यादव, राबडी देवींना दिलासा

रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी जमीनच्या बदल्यात रेल्वेत काही जणांना नोकरी दिली होती, याप्रकरणी त्यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे . १५ मार्च रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडीदेवी, कन्या मीसा भारती यांच्यासह १४ अन्य जणांना १५ मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. लालू प्रसाद यादव तेव्हा रेल्वेमंत्री होते. त्यांनी आपला पदाचा गैरउपयोग करुन १२ जणांना रेल्वेत ग्रुप डीमध्ये नोकरी दिली होती.

या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक न करता आरोपपत्र दाखल केल्याचे न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणी सीबीआयने गेल्या आठवड्यात राबडी देवी यांचा जवाब नोंदवला होता. यानंतर पाच अधिकाऱ्यांच्या टीमने मीसा भारती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची देखील चौकशी केली होती. लालू प्रसाद यादव हे किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर सिंगापूरहून नुकतेच परतले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com