Rajasthan Politics : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप? ; पायलट नवा पक्ष काढणार..

Sachin Pilot : पायलटासोबत किती आमदार 'उड्डाण' घेणार..
Sachin Pilot : Rajasthan Politics :
Sachin Pilot : Rajasthan Politics : Sarkarnama

Rajasthan News : राजस्थान राज्याच्या विधानसभा निवडणुका या तोंडावरती आलेल्या आहेत. एवढ्या नाजूक परिस्थितीत आता काँग्रेसची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. काँग्रेसमधील गृहयुद्ध आता काँग्रेस पक्षाच्या फुटीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात समन्वय साधण्यात काँग्रेस पक्षतश्रेष्ठींना अपयश आल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

Sachin Pilot : Rajasthan Politics :
NCP News: मोठी बातमी! राष्ट्रवादीचा अहमदनगर येथील 9 जूनचा मेळावा स्थगित

गेहलोत आणि पायलट यांच्यात समेट घडवून आणण्यात काँग्रेसला अपयश आलल्याचे बोलले जात आहे. सचिन पायलट यांनी नवा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. एवढेच नाही तर आपल्या पक्षाचे नवे नावही त्यांनी निश्चित केले आहे.

सचिन पायलट 'प्रोग्रेसिव्ह काँग्रेस' नावाचा नवा पक्ष काढू शकतात. या नव्या पक्षाची घोषणा 11 जून रोजी जयपूरमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दिवशी सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांची पुण्यतिथी आहे.

काँग्रेस हायकमांडने यापूर्वी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना दिल्लीत बोलावून भेट घेतली होती. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी सचिन पायलट आणि अशोक गेहलोत एकत्र काम करतील असा दावा केला होता. या सूत्रानुसार सचिन पायलट यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, सचिन पायलट गटाने हा दावा फेटाळून लावला आणि आपण आपल्या मुद्द्यांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. आता सचिन पायलट हे 11 जून रोजी जयपूरमध्ये सभा घेऊन हजारो समर्थकांच्या उपस्थितीत नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करणार असल्याची चर्चा आहे.

Sachin Pilot : Rajasthan Politics :
Nagpur : विदर्भाच्या विकासासाठी गडकरींनी उचलले नाविन्यपूर्ण पाऊल

नवा पक्ष स्थापन झाल्यास पायलटसोबत किती आमदार जातील?

सचिन पायलट यांनी नवा पक्ष काढला तर काँग्रेसचे किती आमदार त्यांच्यासोबत जातात, यावरही राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे. याशिवाय अशोक गेहलोत यांच्या सरकारसमोर काही धोका आहे की नाही हा मुद्दा सुद्धा उपस्थित राहणार आहे.

यापूर्वी 2020 मध्येही सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती, तेव्हा त्यांच्यासोबत 19 आमदार होते. यावेळीही अनेकजण त्याच्यासोबत राहू शकतात, असे मानले जात आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी दावा सांगणाऱ्या सचिन पायलट यांनी आपल्याच सरकारवर अनेक आरोप केले आहेत, त्यातील एक म्हणजे भाजपच्या वसुंधराराजे सरकारच्या काळात भ्रष्टाचाराची कोणतीही चौकशी झाली नाही, असे पायलटांचे म्हणणे आहे.

Sachin Pilot : Rajasthan Politics :
Nitin Gadkari News : विविध लवादांची खंडपिठे असावी देशाच्या हृदयस्थानी, गडकरींनी उचलले ‘हे’ पाऊल !

पायलट यांनी संपूर्ण राज्यात आंदोलनाचा इशारा दिला होता :

या आरोपांबाबत सचिन पायलट यांनी 11 मे रोजी प्रवास सुरू केला होता. अजमेर ते जयपूर या 125 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान सचिन पायलट यांनी 15 दिवसांची मुदतही आपल्या पक्षाला दिली होती, मात्र दोन्ही बाजूंमध्‍ये हे प्रकरण जुळू शकले नाही. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यात आंदोलन करू, असा इशारा सचिन पायलट यांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com