Ashok Gehlot Vs Sachin Pilot : विधानसभा निवडणुकीआधी राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये मोठी घडामोड; गेहलोत- पायलट संघर्षावर...

Rajasthan Congress News : राजस्थानमधील गेहलोत - पायलट संघर्ष मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा उफाळून आल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती....
Ashok Gehlot Vs Sachin Pilot, Rajasthan Congress News
Ashok Gehlot Vs Sachin Pilot, Rajasthan Congress NewsSarkarnama

Rajasthan Congress : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसला मोठं बळ मिळालं आहे.मात्र, एकीकडे विजयामुळे आनंदाचं वातावरण असताना राजस्थानमधील गेहलोत - पायलट संघर्ष मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा उफाळून आल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती. पायलट यांनी स्वतःच्या सरकारविरोधात दंड थोपटत मागण्या पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.

राजस्थानमधील विधानसभा निवडणुका अवघ्या सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच गेहलोत पायलट वादानं काँग्रेसचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र, आता राजस्थान काँग्रेसमधील या दोन दिग्गज नेत्यांमधील संघर्षावर पडदा पडला आहे.

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी सरचिटणीस केसी वेणुगोपाल, राजस्थान काँग्रेस प्रभारी सुखविंदर सिंह रंधावा, काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi), मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सोमवारी (दि.29) रात्री उशिरा सुमारे चार तासांची मेगा बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीअगोदर काँग्रेसकडून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील सुरु असलेला संघर्ष मिटवण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

Ashok Gehlot Vs Sachin Pilot, Rajasthan Congress News
Gehlot Vs Pilot : राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप? सचिन पायलट यांचा गेहलोत सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम; म्हणाले...

राजस्थानमध्ये सचिन पायलट हे प्रदेशाध्यक्ष असताना 2018 मध्ये काँग्रेसनं भाजपचा पराभव करत सत्ता मिळवली. त्यानंतर सचिन पायलट यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतानाच काँग्रेसच्या हायकमांडने पायलटांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत मुख्यमंत्री म्हणून अशोक गेहलोतांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आणि पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. मात्र, त्यानंतर नाराज पायलट गेहलोत संघर्ष कायमच काँग्रेसची डोकेदुखी ठरत आला आहे.

सरकार स्थापन झाल्यानंतर पक्षातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये तब्बल नऊवेळा वादाची परिस्थिती उद्भवली आणि काँग्रेस हायकमांडने प्रत्येकवेळी त्यांच्यात समझोता घडवून आणला होता. काँग्रेसचं नेतृत्त्व दोघांमधील वाद मिटवतं, परंतु काही काळानंतर परिस्थिती पुन्हा बिघडते. मात्र, यावेळी तसं नसल्याचा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Ashok Gehlot Vs Sachin Pilot, Rajasthan Congress News
Rajasthan News: सचिन पायलटांचा अल्टिमेटम् काँग्रेसने साफ धुडकावला; खर्गे-गहलोत दिल्लीत बैठक!

राजस्थानमधील गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद मिटवण्याचा काँग्रेस नेतृत्त्वाचा प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेसचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत गेहलोत आणि पायलट यांच्यातील वादावर तोडगा काढताना नवीन राजकीय फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

वर्षअखेर राजस्थानात विधानसभा निवडणूका असून माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या पक्षाविरूद्धच्या आंदोलन उभे करण्याच्या निर्णयावर कॉंग्रेस पक्ष श्रेष्टी काही तरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेसच्या अंतर्गत वादात निवडणूका कशा पार पाडायच्या त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यामुळे आता कर्नाटक निवडणूकांचा निकाल लागताच कॉंग्रेस सचिन पायलट आणि अशोक गहलोत वादावर काही तरी तोडगा काढण्याच्या विचारात आहे. या निर्णयाने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या खुर्चीला सध्यातरी धोका नसून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढविल्या जाणार आहेत.

Ashok Gehlot Vs Sachin Pilot, Rajasthan Congress News
Sambhajiraje Chhatrapati News: संभाजीराजेंचा गौतमी पाटीलला काल पाठिंबा आज यू टर्न; म्हणाले, अशा 'कले'ला..

मागील अनेक दिवसांपासून राजस्थान काँग्रेस(Rajasthan Congress) च्या नेतृत्वामध्ये बदल व्हावा, अशी मागणी सचिन पायलट करत आहेत. जुलै २०२० साली त्यांनी हीच मागणी समोर ठेवून बंड केले होते. तेव्हापासून या दोन नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. या बंडानंतर सचिन पायलट यांचे मुख्यमंत्रीपद, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आले. या निर्णयापासून सचिन पायलट आणखी आक्रमक झाले आहेत.

१५ दिवसांचा अल्टिमेटम...

राजस्थानमध्ये २०१८ साली काँग्रेस सत्तेत आल्यापासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री गेहलोत- पायलट यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या दोन दिग्गज नेत्यामधील अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा अडचणीत आला होता. त्यानंतर आपल्याच सरकारविरोधात पायलट यांनी पाच दिवसांच्या ‘जनसंघर्ष यात्रे’चे आयोजन केले होते.

अशोक गेहलोत सरकारकडून तत्कालीन वसुंधराराजे सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात आहे असा आरोप पायलट यांच्याकडून करण्यात आला होता. त्यांनी गेहलोत सरकार आणि काँग्रेसला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. तसेच आगामी १५ दिवसांत वसुंधराराजे (Vasundhara Raje) सरकारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी न केल्यास आम्ही राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा पायलट यांनी दिला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com