सोनाली फोगाटच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे गूढ वाढले

Sonali Phogat : गोवा (Goa) पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे
Sonali Phogat Passes Away Latest News
Sonali Phogat Passes Away Latest NewsSarkarnama

Sonali Phogat : नवी दिल्ली : टिक टॉक स्टार आणि भाजप (BJP) नेत्या सोनाली फोगटच्या (Sonali Phogat) मृत्यूचे गूढ वाढत चालले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोनालीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. सोनाली फोगटच्या मृत्यूचे कारण पीएम रिपोर्टमध्ये देण्यात आलेले नाही. मात्र, व्हिसेरा आणि टिश्यू पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, गोवा (Goa) पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात सुधीर सांगा आणि सुखबिंदर हे आरोपी आहेत. हे दोघेही सोनालीच्या स्टाफमधील आहेत, सुधीर तिचा पीए आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी सुधीरवर अनेक आरोप केले आहेत.

Sonali Phogat Passes Away Latest News
उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षपदी अखेर भूपेंद्र सिंह; मौर्य यांच्या नकारामुळे निर्णय बदलला

हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि सोनालीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. संशयितांचीही चौकशी सुरू आहे. सोनाली फोगट 22 ऑगस्टला गोव्यात पोहोचली तेव्हा सांगवान आणि वासी तिच्यासोबत होते. विशेष म्हणजे, हरियाणातील हिसार येथील रहिवासी असलेल्या सोनाली फोगटला संशयास्पद हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर तिला मंगळवारी सकाळी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Sonali Phogat Passes Away Latest News
मुख्यमंत्री शिंदेंनी जयंत पाटलांना काढला चिमटा; तुम्ही तर विरोधी पक्षनेता...

यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयाने यापूर्वीच दोन फॉरेन्सिक तज्ञांची समिती स्थापन केली होती. फोगटचा भाऊ ढाका याने गोवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, त्याच्या बहिणीच्या दोन साथीदारांनी तीची हत्या केली आहे. सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने बुधवारी दावा केला होता की तिची हत्या तिच्या बहिणीच्या दोन साथीदारांनी केली आहे. गोवा पोलिसांनी दोन्ही व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतरच कुटुंबीय शवविच्छेदनास परवानगी देतील, असे रिंकूने सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com