
West Bengal Politics : पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात केंद्रीय मंत्री निशीथ प्रामाणिक यांच्या रॅलीत मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (२५ फेब्रुवारी) दुपारी बुरीरहाट भागात त्यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात गोळीबार आणि बॉम्बस्फोट झाला. सुदैवाने यात निशीथ प्रामाणिक यांना कोणतीही हानी झाली नाही. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत.
कार्यक्रम सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या गदारोळानंतर त्यांनी मोर्चाही काढला. मात्र कार्यक्रमात पोलिस आणि सीआयएसएफचा बंदोबस्त कसा तोडण्यात आला. यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या गदारोळानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री निशीथ प्रामाणिक यांचा शनिवारी दिनहाटाच्या बुरीरहाट भागात जनसंपर्क कार्यक्रम होता. तर निशीथ यांना काळे झेंडे दाखवणू निषेध करण्याचा निर्णय तृणमूलने (टीएमसी) निर्णय घेतला होता. दरम्यान, निशीथ प्रामाणिक यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि सीआयएसएफ या परिसरात तैनात करण्यात आला होता. मात्र, संघर्ष टाळता आला नाही.
दरम्यान, या हल्लानंतर निशीथ प्रामाणिक यांनी बंगाल सरकारवर निशाणा साधला आहे. बंगालमध्ये भयानक परिस्थिती आहे. बॉम्बस्फोट होतायेत. विरोधी पक्षांना लोकशाही अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. बंगाल आता दुष्टांचे राज्य बनले आहे. ज्या प्रकारे हल्लेखोर हल्ले करत आहेत. हे सामान्य राजकीय वातावरण कधीच असू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्याच्या घराला टीएमसी समर्थकांनी घेराव घातला होता. यावरून कूचबिहारमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.