Shivsena : संसदेतील शिवसेना कार्यालयातील ठाकरे पिता पुत्रांचे फोटो हटवले

Eknath Shinde : संसदेतील शिवसेना कार्यालयातील फोटो बदलल्याचे चित्र
Shivsena
ShivsenaSarkarnama

Maharashtra Politics : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर शिंदे गटाने संसदेतील आणि विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला.

यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयातील फोटो बदलल्याचे समोर आले आहे. संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाकडे आल्यानंतर आता कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले आहेत.

Shivsena
Eknath Shinde : विधानभवनाच्या पायऱ्यांवरून मुख्यमंत्र्यांचा पाय घसरला; अन् महाजनांनी...

संसदेतील शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवून तेथे एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलल्याचे दिसून येत आहे.

Shivsena
Budget Session : गळ्यात कांदा-कापसाच्या माळा : भाव नाही मिळाला तर कांद्यासारखं सोलून काढू; विरोधक आक्रमक !

दरम्यान, संसदेतील शिवसेना कार्यालयात आता बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो दिसून येत आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आल्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in