मोठी बातमी! खाद्‍यतेल होणार स्वस्त; जीएम मोहरीच्या वाणाला केंद्रीय संस्थेची मंजुरी

Oil : युरोपमधील एक प्रजाती वापरून हे वाण तयार केले गेले आहे.
Edible oil Latest News
Edible oil Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : जीएम पिकांबाबतचा वाद नवीन नसला तरी केंद्रीय जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने (जीईएसी) जनुकीय सुधारित मोहरीचे डीएमएच-११ (हायब्रीड) हे बियाणे वापरण्यास मान्यता दिली आहे.

सध्या हे बियाणे फक्त व्यावसायिक शेतीतच वापरता येते. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिल्यानंतर देशातील शेतकऱयांना हे बियाणे वापरणे सुलभ होईल व खाद्यतेलांच्या भडकलेल्या किमती कमी होतील, अशी आशा व्यक्त होते. (Edible oil Latest News)

Edible oil Latest News
अर्धी प्रतिज्ञापत्रे फॉरमॅटमध्ये तर आर्धी नाही..असं कसं..परब म्हणाले...

या नवीन मान्यताप्राप्त मोहरीच्या जातीचे नाव डीएमएच-11 (हायब्रीड) असे आहे. वरुण नावाच्या मोहरीच्या पारंपारिक जाती आणि युरोपमधील एक प्रजाती वापरून हे वाण तयार केले गेले आहे. त्यामुळे मोहरीचे देशांतर्गत उत्पादन ३० टक्क्यांपर्यंत वाढेल, असा दावा करण्यात येत आहे.

यूपीए सरकारच्या काळात तत्कालीन पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी २००९ मध्ये वांग्याच्या एका जातीच्या भारतातील पहिल्या वाणाला मान्यता दिली. त्यानंतर दीर्घकाळाने आता खाद्यतेलाच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने जीएम मोहरीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मोहरीचे देशांतर्गत उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

Edible oil Latest News
गुजरात आणि दिल्ली महापालिकेत 'आप'ला रोखण्यासाठी भाजपचा गेम प्लॅन तयार...

दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू दीपक पेंटल यांच्या नेतृत्वाखालील पथकाचे वैज्ञानिक संशोधन जीएम मोहरीवरील जीईएसीच्या तज्ञ समितीने स्वीकारले आहे, असे आज सांगण्यात आले. भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही (सीएआर) मोहरीच्या परागीकरणावरील अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर या बियाण्यांना मान्यता दिली आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची अद्याप प्रतीक्षा आहे.

जीएम मोहरीबाबत याआधी बराच वाद झाला होता. नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेसच्या म्हणण्यानुसार जनुकीय सुधारित पिकांचा वापर बीटी कापसाच्या बाबतीत अयशस्वी झाला आहे. २००६ पर्यंत बीटी कापसाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली होती पण त्यानंतर त्याचे उत्पादन झपाट्याने घटू लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान व हाल यांचे दुष्टचक्र पुन्हा सुरू झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in