मोठी बातमी : अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांनीही कुटुंबासोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
Mukesh Ambani |
Mukesh Ambani |

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी लिस्टेड कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबानी कुटुंबाला चार-पाच तासांत संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर ही धमकी आल्याची माहिती आहे. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत. पोलिसांनी या धमकी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. (Death threat to Mukesh Ambani family)

रिलायन्स फाऊंडेशनच्या हरकिशनदास हॉस्पिटलच्या डिस्प्ले क्रमांकावर हे फोन कॉल्स करण्यात आले आहेत. यामध्ये मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर धमकीचे फोन एक-दोनदा नव्हे तर तीनदा करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी डीबी मार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तीन वेळा फोन केल्याचे सांगण्यात येत आहे.

Mukesh Ambani |
Narendra Modi : भष्ट्राचार, घराणेशाही विरोधात लाल किल्ल्यावरुन रणशिंग

या तक्रारीनंतर अंबानींच्या कुटुंबीयांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलीस या कॉल्सची पडताळणी करत आहेत. कॉलर एकच असून त्याने सलग तीन कॉल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

मुकेश अंबानी यांना Z+ सुरक्षा

मुकेश अंबानी यांना हिजबुल मुजाहिद्दीनकडून धमक्या मिळाल्यानंतर 2013 मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने झेड प्लस सुरक्षा प्रदान केली होती. त्यांची पत्नी नीता अंबानी यांना 2016 मध्ये केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा प्रदान केली होती. त्यांच्या मुलांनाही महाराष्ट्र सरकारकडून दर्जेदार सुरक्षा दिली जाते.

दरम्यान,आज संपूर्ण देश ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यापासून ते दुर्गम गावांपर्यंत लोक तिरंगा फडकावून स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत आहेत. मुकेश अंबानी यांनीही कुटुंबासोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला.यावेळी मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी अंबानी यांच्या हातातही तिरंगा दिसला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com