Gyanvapi case : न्यायालयाचा मोठा निर्णय ! ज्ञानव्यापीत कारंजे नव्हे तर शिवलिंगच...

Gyanvapi case | पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार
Gyanvapi case
Gyanvapi case

वाराणसी : ज्ञानवापी खटल्याचा निकाल देताना जिल्हा न्यायाधीश ए.के.विश्वेश यांच्या एकल खंडपीठाने हा खटला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी ज्ञानवापी मस्जिदमध्ये पूजेची परवानगी मागणारी याचिका सुनावणीस योग्य मानली आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हिंदू पक्ष खूश आहे.

ज्ञानवापी मस्जिद प्रकरणी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा न्यायाधीश ए.के.विश्वेश यांनी निकाल देताना अंजुमन इंसंजारिया समितीची याचिका फेटाळून लावत ज्ञानवापी संकुलात पूजेचा अधिकार मागणाऱ्या 5 हिंदू महिलांनी दाखल केलेला दावा 'ऐकण्यायोग्य' असल्याचे न्यायालयाने म्हटले. जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर मुस्लिम पक्षाने याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Gyanvapi case
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचे निधन

२४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. आज ज्ञानवापी प्रकरणी होणारी सुनावणी पाहता सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. ''न्यायालयाच्या आवारात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 2000 हून अधिक फौजफाटा येथे तैनात आहे. त्याचबरोबर यूपीची राजधानी लखनऊमध्येही ज्ञानवापी मशिदीबाबत अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती ए.एस.पी संतोष कुमार सिंह यांनी दिली होती.

ज्ञानवापीमधील शृंगार गौरीसह इतर धार्मिक स्थळांवर नियमित पूजा करण्यास परवानगी देण्याची मागणी हिंदूं याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती. त्याच वेळी, हे प्रकरण न्यायालयात टिकणार नाही, असा युक्तिवाद करत मुस्लिम बाजूने हे प्रकरण बरखास्त करण्याची मागणी केली होती. मुस्लिम पक्षकारांचा युक्तिवाद फेटाळून लावत न्यायालयाने हिंदू महिलांनी दाखल केलेला दावा 'ऐकण्यायोग्य' असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

ज्ञानवापीचे प्रकरण अनेक तारखा पार करून या टप्प्यावर पोहोचले आहे. 1993 मध्ये प्लेस ऑफ वर्शिप कायद्यामुळे हे प्रकरण धुळखात पडले होते. पण राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे प्रकरण पुन्हा कायदेशीररित्या मांडण्यात आले. 2021 मध्ये पाच महिलांनी शृंगार गौरीच्या नियमित दर्शनाची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com