Karnataka Election : सोलापूरशी नातं सांगणाऱ्या इंडीत भाजप-काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच

त्यामुळे इंडीकडे सोलापूरकरांच्या नजरा कायम लागलेल्या असतात.
Congress and BJP
Congress and BJP Sarkarnama

सोलापूर : भाजप व काँग्रेसकडून स्टार प्रचारकांनी प्रचाराचा धुराळा उडवित निवडणुकीचे वातावरण तापवलेल्या इंडी (जि. विजयपूर) विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक होत आहे. या मतदारसंघात विकासाबरोबर जातीचेही समीकरण जोर धरु लागले आहे. दरम्यान, इंडी मतदारसंघाचे सोलापूरशी (solapur) वेगळे नाते आहे. सोलापूरचे रविकांत पाटील हे इंडीमधून तीनवेळा निवडून आले आहेत, त्यामुळे इंडीकडे सोलापूरकरांच्या नजरा कायम लागलेल्या असतात. (Big fight between BJP and Congress in Indy constituency)

भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) कासुगौडा पाटील, काँग्रेसतर्फे (Congress) यशवंतरायगौडा पाटील तर धर्मनिरपेक्ष जनता दलातर्फे बी. डी. पाटील निवडणूक रिंगणात आहेत. आम आदमी पार्टीचे गोपाल पाटील हेही नशीब आजमावत आहेत. तेली, लिंगायत, धनगर समाजाचा प्रभाव असलेल्या इंडी मतदारसंघात सिंचनाच्या मुद्द्यावर मतदार आग्रही आहेत.

Congress and BJP
Sharad Pawar News : शरद पवारांनी सांगोल्याच्या जनतेला दिला हा शब्द

पाणी, वीज व रस्त्यांच्या विकासाबाबत जागरुक असलेल्या या मतदारसंघात सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांनी हजेरी लावत प्रचाराचा धुराळा उडवला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे कुमार स्वामी, सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रचार सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे.

डॉ. सार्वभौम बगली यांनी २००८ मध्ये अगदी निसटता म्हणजे केवळ ५७१ मतांनी विजय मिळवत भाजपचा झेंडा या मतदारसंघात रोवला. त्यानंतर २०१३ व २०१८ या दोन्ही वेळेस काँग्रेसच्या यशवंतरायगौडा पाटील यांनी आमदारकी कायम राखली आहे.

Congress and BJP
Congress News : खर्गे व कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी : पटोलेंकडून भाजप, राठोडांविरोधात पंढरपूर पोलिसांत तक्रार दाखल

आचारसंहितेपूर्वी जलसिंचन योजनचे भूमिपूजन

इंडी मतदारसंघातील मतदारांच्या सिंचनाच्या प्रश्‍नावरील आग्रही भूमिकेमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी होर्ती (जि. विजयपूर) येथे रेवणसिद्धेश्‍वर पाणी योजनेचे आचारसंहिता लागण्यापूर्वी भूमिपूजन केले. या योजनेमुळे परिसरातील एक लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या योजनेच्या भूमिपूजनामुळे भारतीय जनता पक्षाला विजयाची आशा वाटते.

Congress and BJP
Pandharpur News : पंढरपूर राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांनी सोलापुरात येऊन घेतली पवारांची भेट; विठ्ठल परिवाराची मुंबईत लवकरच बैठक

सोलापूरच्या पाटलांची व्होट बँक

मूळचे सोलापूरचे व इंडी मतदारसंघातून सहावेळा निवडणूक लढविलेले रविकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी तीन महिने श्रेष्ठींकडे पाठपुरावा केला. भाजप नेते येडियुरप्पा यांचे ते समर्थक आहेत. एकवेळ त्यांनी बंडखोर येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाकडून निवडणूक लढविली होती. तीनवेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढवून त्यांनी विजयश्री खेचून आणली होती.

पाटील यांच्या काळात स्टेडियम, बस स्थानक, रस्ते, पाणी, मिनी विधानसभा अशा विविध विकास कामांना गती देण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. तर त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली असती तर त्यांची व्होट बँक असल्याने ते सहज विजयी झाले असते, असा मतदारांचा सूर आहे. अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवून त्यांनी घेतलेली मते नजरेत भरण्यासारखी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com