भाजपला मोठा धक्का : या राज्यांतील सर्व उमेदवार पिछाडीवर!

पोटनिवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजप उमेदवार पराभवाच्या उंबरठ्यावर आहे.
Dimpal Yadav
Dimpal YadavANI

नवी दिल्ली : गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीबरोच पाच राज्यांत विधानभेची, तर उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक (By-Election) होत आहे. पोटनिवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजप (BJP) उमेदवार पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. एकीकडे गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत असताना हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सत्तेसाठी वेगळे डावपेच आखावे लागण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे पोटनिवडणुकीत मात्र भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. (Big blow to BJP in by-elections in five states: Candidates trailing in all seats)

बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, राजस्था या राज्यांत विधानसभेची, उत्तर प्रदेशमध्ये मैनापुरी लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यात बिहारच्या कुढनीमध्ये नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल (जदयू), ओडिशाच्या पदमपूरमध्ये बिजू जनता दल, राजस्थानच्या सरदाशहरमध्ये काँग्रेस, उत्तर प्रदेशमधील दोन जागांपैकी रामपूरमध्ये समाजवादी पार्टी, तर खतौलीमध्ये रालोद आघाडीवर आहे. छत्तीसगढच्या भानुप्रतापपूरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे.

Dimpal Yadav
विनोद तावडे नितीन गडकरींप्रमाणे हिमाचलमध्ये बाजी पलटवणार?

उत्तर प्रदेशमधील मैनापुरी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव या निवडणूक लढवत आहेत. त्या तब्बल १ लाख ६० हजार मतांनी आघाडीवर आहेत. लोकसभेच्या जागेबरोबरच विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशबरोबरच पाच राज्यातील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

Dimpal Yadav
BJP : हिमाचलमध्ये सत्ता स्थापनेच्या खेळीसाठी 'या' दोन नेत्यांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी

छत्तीसगडमध्ये भानुप्रतापपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या सावित्री मंडवी ह्या १४ हजार ४१८ मतांनी आघाडीवर आहेत. या ठिकाणी भाजपचे ब्रम्हानंद नेतम हे पिछाडीवर आहेत. नवीन पटनाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या ओडिशामध्ये बिजू जनता दलाचे उमेदवार तब्बल १५ हजार मतांनी पुढे आहेत. या ठिकाणी भाजप पिछाडीवर पडला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे उमदेवार अनिल कुमार शर्मा हे तब्बल १९ हजार मतांननी अघाडी आहेत, या ठिकाणीही भाजपला उमेदवार मागे आहे.

Dimpal Yadav
Elections; एकनाथ शिंदे सरकारच्या नव्या प्रभागरचनेबाबत संभ्रम?

समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्याने रामपूरमध्ये मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. या ठिकाणी सपाचे असीम रजा हे ५ हजर मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार अशोक सक्सेना पिछाडीवर आहेत. बिहारच्या कुढनीमध्येही जदयूने आघाडी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com