Manish Sisodia: 'आप'ला मोठा धक्का, सिसोदियांचं मंत्रीपद गेलं; आतिशी अन् भारद्वाज यांच्यावर मोठी जबाबदारी

Delhi AAP: सिसोदियांच्या जामीन अर्जावर न्यायालय १० मार्च रोजी निकाल
Arvind Kejariwal
Arvind KejariwalSarkarnama

Atishi and Saurabh Bhardwaj: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शिफारशीवरून अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांची दिल्ली मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी, राष्ट्रपतींनी आप सरकारचे आरोग्यमंत्री असलेले सत्येंद्र जैन आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे राजीनामे स्वीकारले. सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे वेगवेगळ्या आरोपाखाली ईडी-सीबीआयच्या चौकशीत आहेत. दोन्ही नेते सध्या तिहार तुरुंगात आहेत.

अरविंद केजरीवाल (Arawind Kejariwal) यांनी आतिशी मार्लेना (Atishi Marlena) आणि सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj) यांची नावे उपराज्यपाल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवली होती. सध्या सिसोदिया आणि जैन यांच्या खात्याची जबाबदारी कैलाश गेहलोत आणि राजकुमार आनंद यांच्याकडे आहे.

शपथ घेण्याच्या दिवसापासून आतिशी आणि भारद्वाज दोघेही खाती सांभाळण्यास सुरुवात करतील. सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj) हे केजरीवाल यांच्या ४९ दिवसांच्या पहिल्या सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. त्याचबरोबर आतिशी मार्लेना (Atishi Marlena) या शिक्षण क्षेत्रात सिसोदिया यांच्या सल्लागार होत्या.

Arvind Kejariwal
Ravindra Dhangekar : धंगेकरांचा मुंबई दौरा, आघाडीच्या नेत्यांची घेणार भेट : शिवतीर्थावर जाणार?

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. त्याच वेळी, सत्येंद्र जैन हे 'मनी लॉन्ड्रिंग'प्रकरणात ३० मे २०२२ पासून तिहार तुरुंगात आहेत. सिसोदिया राजीनामा देईपर्यंत ३३ पैकी १८ विभाग पाहत होते. त्याचबरोबर जैन यांच्याकडे आरोग्य, उद्योग यासह सात मंत्रालयांची जबाबदारी होती. हे नंतर सिसोदिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते.

Arvind Kejariwal
Ahmednagar : नगर जिल्हा बँकेसाठी आजची रात्र महत्वाची; अजितदादा अन् थोरांताची बैठक, अध्यक्षाचे नाव ठरले?

दिल्लीचे (Delhi Government) माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, जे मद्य धोरण प्रकरणी सीबीआय कोठडीत आहेत, त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळालेला नाही. सीजेआयच्या खंडपीठाने त्यांना थेट सर्वोच्च न्यायालयात येण्याबद्दल फटकारले होते. तुम्ही उच्च न्यायालयात जा, थेट आमच्याकडे येण्याचा अर्थ काय आहे. आपण चुकीच्या परंपरेला चालना देऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

दरम्यान, सोमवारी, दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय १० मार्च रोजी निकाल देणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com