Bullet Train : हिरवा कंदील मिळताच मोदी सरकार अॅक्शन मोडवर; सात दिवसांत मोठा निर्णय

केंद्र सरकारकडून मुंबईतील भूमिगत स्टेशनच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू...
Bullet Train News, PM Narendra Modi Latest News, CM Eknath Shinde News
Bullet Train News, PM Narendra Modi Latest News, CM Eknath Shinde News Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सात दिवसांपूर्वीच बुलेट ट्रेनच्या सर्व रखडलेल्या परवानग्या व कामांना मंजूरी दिली आहे. ठाकरे सरकार गेल्यानंतर बुलेट ट्रेनच्या वेगातच या परवानग्या मिळाल्याने मोदी सरकारही अॅक्शन मोडवर आले आहे. सात दिवसांतच मुंबईतील ट्रेनच्या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. (Bullet Train Latest News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनला ठाकरे सरकारने विरोध केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक कामांना परवानगी मिळू शकली नव्हती. शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर लगेचच सर्व कामांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतही आता पुढील काही महिन्यांतच बुलेट ट्रेनच्या कामांना वेग येणार आहे.

Bullet Train News, PM Narendra Modi Latest News, CM Eknath Shinde News
आदित्य ठाकरेंना सुहास कांदे विचारणार `माझे काय चुकले?`

मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे बुलेट ट्रेनचे भूमिगत स्टेशन उभारले जाणार आहे. तसेच बोगदेही तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत मुंबईतील कामे सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात सुमारे १५० हेक्टर क्षेत्राचं अधिग्रहण करणं गरजेचं आहे. अद्याप या कामाने वेग घेतलेला नाही. काही दिवसांपूर्वी बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच केली होती. त्यावेळी बुलेट ट्रेन प्रकल्प रखडल्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. मात्र, राज्यात आता भाजपप्रणित शिंदे सरकार आल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग मिळण्याची शक्यता आहे.

Bullet Train News, PM Narendra Modi Latest News, CM Eknath Shinde News
नेहरू-गांधींच्या नावावर आम्ही तीन पिढ्या बसून खातील एवढं कमावलं! काँग्रेस आमदाराची कबुली

बुलेट ट्रेनमधील खर्चाचा राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही शिंदे सरकार करणार आहे. ठाकरे सरकारच्या काळात बुलेट ट्रेनला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने बुलेट ट्रेनचे काम मंदावले होते. या प्रकल्पावर शिवसेनेची काय भूमिका असणार आहे याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील दादरा-नगर हवेलीतील १०० टक्के, गुजरातमधील ९८.७९ टक्के आणि महाराष्ट्रातील ७१ टक्के जागेचे संपादन पूर्ण झाले आहे.

  • प्रकल्प खर्चवाढ टाळण्यासाठी प्रकल्पासाठी ८५ टक्के जमीन अधिग्रहित केल्याशिवाय प्रत्यक्ष काम न करण्याचा रेल्वे मंडळाकडून सूचना देण्यात आल्या होत्या.

  • राज्यात बुलेट ट्रेनच्या कामाला अडथळा निर्माण झाला होता. मात्र,आता राज्यात भाजपप्रणित शिंदे सरकार आल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in