कर्नाटकात हिजाबनंतर आता नवीन वादाला तोंड फुटलं ; हिंदू संघटना आक्रमक

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक हा वाद पेटवत आहे.
कर्नाटकात हिजाबनंतर आता नवीन वादाला तोंड फुटलं ; हिंदू संघटना आक्रमक
file photosarkarnama

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपूर्वी हिजाबवरुन (Hijab) वाद पेटला होता. या मुद्द्यावरुन अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. आता ख्रिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलवरून (Bible) नवा वाद सुरु होण्याची चिन्ह आहेत. कर्नाटक (Karnataka) येथे एका शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत बायबल घेऊन येणे सक्तीचे केल्यानं नव्या वादाला तोंड फुटले आहे.

बेंगळुरू येथील क्लेरेन्स स्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. या शाळेच्या पालकांकडून त्यांच्या सहीचे प्रतिज्ञापत्र घेतले असून ज्यामध्ये नमूद केले आहे की,‘विद्यार्थ्यांना बायबल किंवा हिमचे पुस्तक (स्तोत्र) शाळेत नेण्यास आमची हरकत नाही.’ या प्रतिज्ञापत्रावरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. शाळा प्रशासन बिगर ख्रिश्चन विद्यार्थ्यांना बायबल वाचण्यास भाग पाडत असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे.

file photo
राजद्रोहाचा गुन्हा दाखल ; रवी राणा तळोजा तर नवनीत राणा भायखळा कारागृहात..

इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. शाळेवर कारवाई करण्याची मागणीही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. कर्नाटक सरकार शिक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध धार्मिक शिक्षण लादले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

''शाळा गैर-ख्रिश्चन विद्यार्थ्यांना बायबल वाचण्यास भाग पाडत आहे,''असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते मोहन गौडा यांनी केला आहे. यावर कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

file photo
देशद्रोहींवर दगड पडतातच ; गुन्हेगारांबाबत भाजपला मळमळ का ? राऊतांचा सवाल

'भगवद्गीता अनेक वर्षांपासून या देशातील लोकांनी वाचली आहे. गीता सर्व लोक वाचतात आणि जगभरातील सर्व भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर केले जात आहे. आम्ही प्रथम शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ज्ञांशी चर्चा करू आणि त्यानंतर व भगवद्गीतेचा अभ्यासक्रमात समावेश करायचा का नाही याचा निर्णय घेऊ.’

काही दिवसापूर्वी कर्नाटक सरकारने शाळांमध्ये शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता समाविष्ट करण्याची योजना जाहीर केली होती. शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक हा वाद पेटवत आहे, असंही काही जणांनी म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.