यूपी में का बा...फिर भी घमंड बा! भाजपला थेट लोकगायिकेची टक्कर, व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रंगत आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Neha Singh Rathore, yogi Adityanath
Neha Singh Rathore, yogi AdityanathSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची (UP Election 2022) रंगत वाढत चालली असून नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) प्रचार सभांना बंदी घातल्याने डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. त्यामध्ये लोकगीतांचाही आधार घेतला जात आहे. भाजपच्या (BJP) खासदारानेही असंच गाणं तयार करून उत्तर प्रदेश सरकारचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्याला आता बिहारी लोकगायिकेने टक्कर दिली आहे.

भाजपचे खासदार व प्रसिध्द भोजपूरी अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) यांनी 'यूपी में सब बा..' हे गाणं तयार केलं आहे. मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या हस्ते गाण्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. या गाण्याचा वापर आता भाजपकडून उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) प्रचारासाठी होत आहे. रवि किशन यांनी हर हर महादेव असं म्हणत गाण्याची सुरूवात केली आहे. तर आतापर्यंत जे नव्हतं, ते सगळं उत्तर प्रदेशात असल्याचं त्यांनी गाण्यातून सांगितलं आहे.

Neha Singh Rathore, yogi Adityanath
अखिलेश यांचा भाजपला चकवा; बड्या नेत्याला पक्षात प्रवेश देत दिला धक्का

राम मंदिर, काशी कॉरिडॉर, पुर्वांचल एक्सप्रेस वे, एम्स, गरिबांना मोफत रेशन, विविध सरकारी योजनांचा उल्लेख त्यांनी गाण्यात केला आहे. आता या गाण्याला टक्कर देणार 'यूपी में का बा' हे गाणं आलं आहे. बिहारमधील प्रसिध्द लोकगायिका नेहा सिंग राठोड (Neha Singh Rathore) हिने हे गाणं तयार केलं आहे. बिहारच्या निवडणुकीत 'बिहार में का बा' हे गाणं गाजलं होतं. त्यावरच आता उत्तर प्रदेश सरकार व योगी आदित्यनाथांच्या अपयशाचा पाढा वाचणारं, विविध मुद्यांवर त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करणारं गाणं तिनं तयार केलं असून नागरिकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यातून थेट योगी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

Neha Singh Rathore, yogi Adityanath
ज्या आमदारासाठी योगींनी भाजपला धक्का दिला, त्याचंच स्वत:साठी तिकीट कापलं!

नेहा राठोडचं हे गाणं सोशल मीडियात तुफार व्हायरल होत आहे. हाथरस बलात्कार प्रकरण, लखीमपूर खीरीमधील शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याची घटना, बेरोजगारी रस्त्यांवरील खड्डे असे मुद्दे घेत सरकारवर गाण्यांतून निशाणा साधला आहे. जनता नेत्यांना विकास कुठे झाला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. हे गाणं थेट भाजप खासदाराच्या खाण्याला टक्कर देतं असल्यानं विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. त्यामुळे सध्या यूपी में सब बा विरूध्द यूपी में का बा असा सामना रंगला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजप विरूध्द समाजवादी पार्टी (Samajwadi Party) अशी थेट लढत होणार आहे. समाजवादी पक्षाने छोट्या पक्षांना हाताशी धरत आघाडी तयार केली आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. बहुतेक पक्षांकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com