अन् भारती सिंग म्हणाली, काही प्रश्न विचारायला बोलावलंय एवढंच...

कॉमेडियन भारती सिंगच्या घरावर आज एनसीबीने छापे घातले. या छाप्यानंतर भारती आणि तिच्या पतीची एनसीबीने चौकशी सुरू केली आहे.
bharti singh and harsh limbahiyaa arrive at ncb office in mumbai
bharti singh and harsh limbahiyaa arrive at ncb office in mumbai

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (एनसीबी) आज छापा घातला. त्यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला आहे. एनसीबीने सकाळी घरावर छापा घातल्यानंतर दोघेही तातडीने एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.  

बॉलीवूडमधील अमली पदार्थांच्या वापराचा तपास एनसीबीकडून सुरू आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज सकाळी भारती सिंगच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घरावर छापा घातला. या छाप्यात गांजा जप्त करण्यात आला आहे. अतिशय कमी प्रमाणात हा गांजा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

एका अमली पदार्थ वितरकाच्या चौकशीत भारतीचे नाव समोर आले होते. एनसीबीने आज मुंबईत आणखी दोन ठिकाणी छापे घातले. भारती आणि तिच्या पतीला एनसीबीने चौकशीस हजर राहण्यास सांगितले होते. ते दोघेही एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झासे आहेत. त्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. एनसीबीच्या कार्यालयाबाहेर पोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना भारती म्हणाली की, त्यांनी आम्हाला काही प्रश्न विचारण्यासाठी बोलावले आहे, एवढंच.   

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात बॉलीवूडमधील अमली पदार्थांचा वापर समोर आला होता. याचा तपास एनसीबी करीत आहे. या प्रकरणी सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, सुशांतचे काही कर्मचारी आणि इतर काही जणांना एनसीबीने अटक केली होती. रिया चक्रवर्तीसह काही आरोपी हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. नंतर एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची चौकशी केली होती. 

या चौकशीत सर्वच अभिनेत्रींना ड्रग्जंसदर्भात चॅट केल्याची कबुली दिली होती. मात्र, ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार केला होता. या अभिनेत्रींनी केलेले व्हॉट्सअॅप चॅट हे त्यांच्याविरोधात ड्रग्ज घेतल्याचा पुरावा ठरू शकत नाही. यासाठी आणखी ठोस पुरावे एनसीबीला हवे होते. या चौकशीत केवळ सुशांतच्या ड्रग्ज सेवनाचे पुरावे समोर आले होते.

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com