Bharat Jodo Yatra : मेधा पाटकर अन् राहुल गांधी सोबत चालले : थेट नरेंद्र मोदींची टीका!

Bharat Jodo Yatra : गुजरातच्या लोकांना पाण्याचा हक्क नाकारणाऱ्यांना राहुल साथ देत आहेत.
Narendra Modi Medha patkar
Narendra Modi Medha patkarSarkarnama

Bharat Jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आता नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सहभागी झाल्या आहेत. यावरून आता काँग्रेस आणि भाजप यांच्यात टीका टिपण्णी सुरू झाली आहे. थेट पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली. “ज्यांनी मागील तीन दशकांपासून नर्मदा धरणाच्या कामाला रोखून धरलं, त्याच महिलेसोबत काँग्रेस नेते पदयात्रा करत आहेत,” अशा शब्दात मोदींनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर निशाणा साधला.

गुजरातमध्ये मागील तीन दशकापासून नर्मदा धरण प्रकल्पाला पाटकर यांनी विरोध केला. यानंतर त्यांच्यासोबत इतरही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने विरोध केला होता. प्रकल्पात कायदेशीर अडथळे निर्माण केले गेल्याने र्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाचं बांधकाम थांबलं आहे. मेधा पाटकर यांनी गुजरातची बदनामी केल्याचाही आरोप भाजपकडून सतत केला जात होता.

Narendra Modi Medha patkar
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान; रोहित पवारांनी घेतला समाचार

“निवडणुकांवेळी काँग्रेस पक्ष मतं मागण्यासाठी तुमच्याकडे येईल तेव्हा, त्यांना विचारा की, नर्मदा सरदार प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही पदयात्रा काढत होतात. ” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Narendra Modi Medha patkar
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान; रोहित पवारांनी घेतला समाचार

पाटकर या ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींच्या सोबत चालल्या होत्या. आता ही महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करत आहे. २०१७ साली भाजपने सरदार सरोवर प्रकल्पाचं उद्धाटन केलं होतं. या प्रकल्पामुळे हजारो आदिवासी विस्थापित होणार, अशी भूमिका घेऊन पाटकर यांनी नर्मदा प्रकल्पाला विरोध केला होता.

दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही पाटकर यांच्यावर यापूर्वीही टीका केली होती. मेधा पाटकर या नर्मदा प्रकल्पविरोधी, गुजरातविरोधी आहेत, असे जे. पी. नड्डा म्हणाले होते. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र सिंग पटेल यांनीही राहुल गांधीवर निशाणा साधला होता. गुजरातेतल्या लोकांना पाण्याचा हक्क नाकारणाऱ्यांना राहुल साथ देत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com