Bharat Jodo Yatra|सातवा दिवस : विरोधकांचे आरोप, काँग्रेसचे प्रत्युत्तर

Bharat Jodo Yatra : केरळमध्ये 19 तर उत्तर प्रदेशमध्ये फक्त 2 दिवस यात्रा, डाव्यांचीही टीका..
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

दिल्ली : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा ‘भारत जोडो’यात्रा सुरू आहे. दीडशे दिवस चालणाऱ्या या यात्रेचा आज सातवा दिवस आहे. एक आठवडाभराचा कालावधीनंतर या यात्रेवर नजर टाकली तर, आतापर्यंत यावर अनेक प्रतिक्रीया उमटल्या आहेत. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर हल्ले सुरूच आहेत. काँग्रेसकडूनही आपल्यावर होणाऱ्या टीकेवर सातत्याने प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

यात्रेदरम्यान राहुल गांधी कंटेनरमध्ये विश्रांती घेत आहेत. 60 कंटेनरमध्ये यात्रेतील कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर प्रवास करणारे नेते असतील. यापैकी एका कंटेनरमध्ये राहुल गांधी राहणार असे वृत्त आले होते. तर बाकीच्या कंटेनरमध्ये इतर नेते असतील. काँग्रेसने या कंटेनर्समध्ये पंचतारांकीत सुविधा असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र त्यामध्ये पंचतारांकीत सुविधा नसून, मूलभूत गरजेच्या सुविधा असल्याचे काँग्रेसने म्हंटले आहे.

Rahul Gandhi
नितीश कुमारांना पुन्हा झटका : राज्य जेडीयू कार्यकारिणी भाजपमध्ये दाखल

यात्रा सुरू झाल्याच्या तिसऱ्या दिवशी भाजप आणि काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या टी-शर्टवरून वाद सुरू झाला होता. महागाईचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी ४१,२५७ रुपयांचा टी-शर्ट घातला असल्याचा दावा भाजपने केला होता. भाजपने ट्विटरवर यासंबंधीचे फोटोही शेअर केले होते. भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या पाठिंब्याला केंद्रातील सत्ताधारी पक्ष घाबरत आहे, असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

भारत जोडो यात्रेच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच तामिळनाडूमध्ये राहुल यांनी जॉर्ज पोन्नया यांची भेट घेतली होती. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, पोन्नयांना यापूर्वीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अटक करण्यात आली होती. जुलैमध्ये कल्लीकुडीमध्ये पोन्नयांना अटक झाली होती. यामुळे नवा वाद उफाळून आला होता.

काँग्रेसने ट्विटद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला होता. काँग्रेसने एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाच्या गणवेशाचा भाग असलेले खाकी अर्ध पायजमा जळताना दाखवले होते. यावर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी आक्षेप घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. 'आधी पेटलेल्या आगीने भारताचा बहुतांश भाग जाळून टाकला होता. राजस्थान आणि छत्तीसगडमधील उर्वरित सदस्यही लवकरच जळून राख होतील, अशा शब्दात तेजस्वी सूर्या यांनी टीका केली होती.

Rahul Gandhi
मी तर चोरांचा सरदार... : कृषिमंत्र्यांचे अजब विधान!

केरळचे गांधीवादी नेते केई मेमन आणि पद्मश्री पी गोपीनाथन नायर यांच्या स्मारकाचे अनावरण होणार होते. तिरुअनंतपुरममधील एनआयएमएस हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम होणार होता. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख सुधाकरन यांच्या उपस्थितीत राहुल यांनाही कुटुंबीयांनी आमंत्रित केल्याचे वृत्त आहे. मात्र या कार्यक्रमापासून राहुल गांधी दूर होते. काँग्रेस नेते सुधाकरन यांना मेमन आणि नायर यांच्यानातेवाईकांची माफी मागावी लागल्याचे सूत्रांची माहिती आहे.

काँग्रेसची ही यात्रा आता केरळ राज्याच पोहचले आहे. केरळमध्ये जवळपास 19 दिवस ही पदयात्रा असणार आहे. 19 दिवसात सुमारे 450 किमी अंतराची ही यात्रा प्रवास करेल. आता काँग्रेसच्या या यात्रेवर केरळमधील सत्ताधारी सीपीएमचे नेते प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसने भाजपशासित राज्यांकडे अधिक लक्ष द्यावे, असे डाव्यांचे म्हणणे आहे. सीपीआय(एम) ने ट्विट केले की, केरळमध्ये 19 दिवस तर याउलट उत्तर प्रदेशमध्ये फक्त 2 दिवस यात्रा आहे. काँग्रेसचा भाजप आणि आरएसएसशी लढण्याचा हा एक विचित्र मार्ग आहे. डाव्या नेत्यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in