Bharat Jodo Yatra : राहुल गांधींचा आईसोबतचा फोटो व्हायरल : फोटो-कॅप्शनची तूफान चर्चा!

Bharat Jodo Yatra : जो मोहब्बत इनसे मिली...
Rahul Gandhi | Sonia Gandhi | Bharat Jodo Yatra
Rahul Gandhi | Sonia Gandhi | Bharat Jodo YatraSarkarnama

Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या आई सोनिया गांधी यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा नुकतीच राजधानी दिल्लीत पोहचली आहे. सोनिया गांधी आज राहुल गांधी यांच्याबरोबर दिल्लीत ‘भारत जोडो’ यात्रेत सामील झाल्या. याच दरम्यान राहुल यांनी आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला. भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर हा फोटो व्हायरल होत आहे.

भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. या यात्रेत हजारो लोकांनी सहभाग नोंदवला. फरिदाबाद या ठिकाणाहून राहुल गांधी यांनी दिल्लीत प्रवेश केला.दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अनिल चौधरी यांनी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहुल यांचे दिल्लीत स्वागत केले.

Rahul Gandhi | Sonia Gandhi | Bharat Jodo Yatra
Pune Cyber Crime : मोठी बातमी: स्टेट बॅंकेवर सायबर दरोडा

दिल्ली येथील एका आश्रमाममध्ये सर्व नेत्यांना तीन तास विश्रांती घेतली. यात्रा दिल्लीमध्ये प्रवेश करताना,काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश, पवन खेरा, रणदीप सुरजेवाला, भुपिंदर सिंग हुड्डा, कुमारी शैलजा हे यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित होते. विशेष म्हणजे यात्र दिल्लीत प्रवेश केल्यानंतर यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल यांची बहीण प्रियंका गांधी याही यात्रेत सामील झाल्या.

राहुल गांधीनी शेअर केलेल्या या मायलेकांच्या फोटोला पहिल्याच तीन तासात ४८ हजार लाईक्स आणि साडेसात हजारांहून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. आता ही यात्रा लाल किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या ठिकाणी आज संध्याकाळी मोठ्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहेत.

Rahul Gandhi | Sonia Gandhi | Bharat Jodo Yatra
Jaykumar Gore Accident : गंभीर अपघातनंतरही गोरेंनी सहकाऱ्यांना सावरले अन् पहिला फोन या नेत्याला...

एक मोठी अपडेट म्हणजे, आता ही यात्रा पुढचे सलग नऊ दिवस थांबणार आहे. यानंतर आता थेट ३ जानेवारी रोजी भारत जोडो यात्रा पुन्हा दिल्लीतून पुढचा प्रवास सुरु करून श्रीनगरकडे कूच करणार आहे. नवीन वर्ष आगमनानिमित्त यात्रेला नऊ दिवस विश्रांती देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com