'देशाचे तुकडे होतील म्हणणाऱ्यांसोबत काँग्रेसची भारत जोडो यात्रा'

Smriti Irani : पक्षाचे अध्यक्ष कोण ? असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच पडला आहे.
Smriti Irani, Rahul Gandhi
Smriti Irani, Rahul GandhiSarkarnama

सिमला : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधानसभा निवडणूका वर्षअखेरीस लागणार आहेत. भाजपाने (BJP) आतापासूनच इथे प्रचाराला सुरुवात केली आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती (Smriti Irani) इराणी यांनीही नुकतीच हिमाचल प्रदेशमध्ये हजेरी लावली. ‘नारी को नमन’या कार्यक्रमासाठी ते सिमला जिल्ह्यातील रामपूर येथे उपस्ठित होत्या. या वेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, राहुल गांधी, (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) यावर त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसने जनतेला विकासापासून, आवश्यक सोयी-सुविधांपासून कायमच उपेक्षित ठेवले. मात्र भारतीय जनता पक्षाकडून आता विकास होत आहे. काँग्रेसमुळे मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली विकासाची कामे भाजपकडून केली जात आहेत, असे इराणी म्हणाल्या.(Latest Marathi News)

भाजपच्या कार्यकाळात देशात एकूण ११ हजार शौचालये बांधण्यात आले, यापैकी जवळपास २ लाख शौचालये फक्त हिमाचल प्रदेशमध्ये बांधण्यात आली आहेत. आज देशातील महिलांवर्गासाठी पुरेश्या प्रमाणात स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत की नाही? असं त्यांनी उपस्थित जनसमुदायासमोर प्रश्न विचारला. अटल बोगद्याचे काम काँग्रेसने कित्येक वर्षे पूर्ण केले नव्हते. मात्र भाजपाने या बोगद्याचे काम पूर्ण केले, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

Smriti Irani, Rahul Gandhi
'Bharat Jodo' साठी काम न करणाऱ्या आमदारांचे तिकिट कापणार : काँग्रेस नेत्याचा कडक इशारा

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरसुद्धा इराणी यांनी जोरदार टीका केली. आमच्या पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? असा प्रश्न स्वत: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. तसेच भारताचे तुकडे-तुकडे होतील, असे म्हणणाऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे, अशी टीकाही यावेळी स्मृती इराणी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com