
Panjab Political News : पंजाबचे राज्य सरकार आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात संघर्षाची ठिगणी पडली आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आप सरकार संविधानाच्या विरोधात काम करत असल्याचा आणि त्यांच्या पत्रांना उत्तर देत नसल्याचा आरोप केला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून त्यांच्या पत्रांना उत्तर न दिल्यास राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतो, असा इशारा दिला आहे. अशात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेत असताना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या आरोपांना उत्तरे दिली आहेत.
राज्यपालांनी पंजाबच्या नागरिकांच्या भावनांची परीक्षा घेऊ नये. तुम्ही आम्हाला धमकी देत आहात की आम्ही पत्रांना उत्तर दिले नाही तर पंजाब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करू. पण तुम्ही या ऑर्डर कोणाकडून घेत आहात? राज्यपाल महोदय, आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. तुमच्या पत्रात सत्तेची भूक आहे. आम्ही पत्रांना उत्तर देऊ, पण आम्हाला धमकावू नका. हा फक्त भाजपचा अजेंडा आहे. पंजाबचा प्रश्न आला तर मी तडजोड करणार नाही. अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यपालांना सुनावले आहे.
भगवंत मान म्हणाले, चंदीगडमधील एसएसपीची रात्री उशिरा बदली झाली आणि मला एकदा विचारलेही नाही. तुम्ही फक्त भाजपची बाजू घेत आहात. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आमच्या सरकारने 50,000 कोटींची गुंतवणूक आणि 3400 प्रकल्प दिले आहेत. टाटा स्टील, नेस्ले आणि अनेक मोठ्या कंपन्या पंजाबमध्ये आल्या आहेत. यातून राज्यात शांतता आणि सलोख्याच वातावरण आहे आहे हेच दिसून येते, पण, तुम्हाला सत्ता हवी असेल तर तुम्ही राज्यपालांना राजस्थानमध्ये जावे आणि तिथे भाजपचा मुख्यमंत्री बनावे.
तसेच, आतापर्यंत तुम्ही मणिपूरबाबत काही विधान केले आहे का, मणिपूरमध्ये संविधान लागू होत नाही का? यूपीमध्ये काय चालले आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याची तारीख देऊ शकतात का? असे सवालही भगवंत मान यांनी राज्यपाल पुरोहितांना केले आहेत. तसेच, राज्यपालांनी 16 पत्रे लिहिली असून आम्ही त्यातील 9 पत्रांना उत्तरेही दिली आहेत. पण गेल्या दीड वर्षांपासून एकूण सहा विधेयके तुमच्याकडे प्रलंबित आहेत, तुम्ही त्यावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. आम्ही जनतेने निवडून दिलेले सरकार आहोत, लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. पण तुम्ही आमची बिले अडवत आहात, असाही सवाल मान यांनी उपस्थित केला आहे.
पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे. आमच्या सरकारने 23,518 ड्रग्ज पेडलर, 1,627 किलोपेक्षा जास्त हेरॉइन जप्त केले आहे. यासोबतच 13.29 कोटी ड्रग मनी आणि 66 ड्रग्ज तस्करांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 23 ऑगस्ट रोजीच 41 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. पण हरियाणाच्या राज्यपालांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना नूहबाबत कोणती सूचना दिली आहे का, हरियाणामध्ये केंद्राप्रमाणेच भाजपचे सरकार आहे. याकडेही मान यांनी लक्ष वेधले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.