मी भगवंत मान...! भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Panjab| Bhagwant Mann पंजाबच्या निकालातून आम आदमी पक्षाने काँग्रेस, (Congress) भाजप, अकाली दल या सर्वांना धुळ चारत पंजाबमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले.
Bhagwant Mann
Bhagwant Mann

चंढीगड : आम आदमी पार्टी (AAP) चे भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी आज पंजाबच्या (panjab) 25 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भगतसिंग यांचे पंजाबमधील वडिलोपार्जित गाव खटकर कलान येथे हा शपथविधी पार पडला. यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Aravind Kejariwal) यांच्यासह पक्षातील आणि कुटुंबातील काही मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. (Bhagwant Mann takes oath as the Chief Minister of Punjab)

विशेष म्हणजे, कोणत्याही केंद्रीय मंत्री किंवा राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही मोठ्या नेत्याला शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. या शपथविधी सोहळ्याची खास बाब म्हणजे ज्या लोकांना या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले होते. त्यात पुरुषांना पिवळ्या रंगाची पगडी आणि महिलांसाठी पिंवळ्या रंगाच्या ओढण्या परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. भगतसिंग यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पिवळ्या रंगाला प्राधान्य देण्यात आले होते.

Bhagwant Mann
भगवंतसिंग पंजाबचे नवे किंग; आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा केला दारूण पराभव...

नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत AAP ने दणदणीत विजय नोंदवला, दिल्लीच्या बाहेर प्रथमच आम आदमी पक्षाने (AAP) पंजाबमध्ये एकहाती सत्ता काबीज केली आहे. पंजाबच्या निकालातून आम आदमी पक्षाने काँग्रेस, (Congress) भाजप, अकाली दल या सर्वांना धुळ चारत पंजाबमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले. आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंतसिंग मान (Bhagwant Singh Mann) यांनी सुमारे 45 हजारांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत काँग्रेसला पछाडले. तर, नवज्योत सिद्दू, कॅप्टन अमरिंदर सिंह, चरणजित चन्नीसह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला आहे.संगरूर जिल्ह्यातील धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या मान यांनी काँग्रेसच्या दलवीर सिंग गोल्डी यांच्यावर 58206 मतांनी विजय मिळवला.

1973 मध्ये संगरूच्या सतोज गावात जन्मलेल्या मान यांनी कॉमेडियन म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांनी 2011 मध्ये मनप्रीत सिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील पंजाब पीपल्स पार्टीसोबत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांनी लेहरागागा मतदारसंघातून निवडणूक लढवली नाही. मात्र ते 2014 मध्ये आपमध्ये सामील झाले आणि संगरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवत विजयी झाले. जेव्हा त्यांनी पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे सुखदेवसिंग धिंडसा यांचा पराभव केला, त्यावेळी पंजाबच्या राजकारणात त्यांचे महत्त्व वाढले. यानंतर मान यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा विजय मिळवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com