"इतिहासात कोणी असा निर्णय घेतला नसेल" : भगवंत मान मोठी घोषणा करणार

Bhagwant Mann | Aam Adami Party | Punjab : ट्विट करत केली घोषणा
Bhagwant Mann
Bhagwant MannSarkarnama

अमृतसर : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी (Punjab Chief Minister) काल आम आदमी पक्षाचे भगवंत मान (Bhagwant Mann) विराजमान झाले. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधीनंतर मान यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत पंजाबची सूत्र हाती घेतली. त्यानंतर आता आज त्यांनी ट्विट करत एक मोठा निर्णय घेणार असल्याची घोषणा केली आहे.

मान यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पंजाबच्या जनतेच्या हिताचा आज मी एक मोठा निर्णय जाहीर करणार आहे. पंजाबच्या इतिहासात असा निर्णय कोणी घेतला नसेल. लवकरच घोषणा करणार. असे ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील हे ट्विट रिट्विट केले आहे. त्यामुळे मान नेमका कोणता निर्णय घेणार याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com