पंजाबमधील निवडणूकीच्या तोंडावर शेतकरी पुन्हा ठरले खलिस्तानी

सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी पंजाब सरकारला धारेवर धरले आहे
पंजाबमधील निवडणूकीच्या तोंडावर शेतकरी पुन्हा ठरले खलिस्तानी

PM Narendra Modi 

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पंजाब दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांच्या मार्गावर अचानक आंदोलकांचा मोठा जमाव आल्यामुळे पंतप्रधानांना जवळपास 20 मिनिटे एकाच ठिकाणी थांबावे लागले. तसेच पर्यायी मार्गाचीही व्यवस्था नसल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करुन त्यांना माघारी जावे लागले.

या घटनेचे पडसाद आता सोशल मिडीयावर दिसू लागले आहेत. सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी पंजाब सरकारला धारेवर धरले आहे. तर काहींनी थेट शेतकऱ्यांनाच या घटनेला जबाबदार धरत त्यांना पुन्हा खलिस्तानी म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या ताफ्याला अडवणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना एका नेटकऱ्याने खलिस्तानी म्हणत त्यांना निर्दयीपणे चिरडलेच पाहिजे, असे म्हटले आहे.

एका ट्विटर युजरने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनाही खलिस्तानी दहशतवादी म्हणत लाज वाटली पाहिजे, असे टीका केली आहे.

पंजाबमध्ये शेतकरी आंदोलकांनी पंतप्रधानांचा ताफा अडवल्याने एका युजरने, खलिस्तानी दहशतवादी रस्त्यावर उतरले आहेत, पंजाब आता पंतप्रधानांसाठी सुरक्षित नाही, असे म्हणत पुन्हा शेतकऱ्यांना खलिस्तान्यांची उपमा दिली आहे.

पंतप्रधानांचा ताफा परतल्यानंतर भटिंडा विमानतळावर पंतप्रधानांचा ताफा पोहचल्यानंतरचा एक फोटो एसडी देशमुख नावाच्या एका ट्विटर युजरने शेअर करत त्यांचा समाचार घेतला आहे. 'ही तुमच्या तोंडावर मोठी चपराक आहे, मुख्यमंत्री चरणजित सिहं चन्नी ….मला आशा आहे की कर्म तुम्हाला आणि तुमच्या घाणेरड्या पक्षाला चपराक देईल… खलिस्तानी… काँग्रेस… पाकिस्तान… हे तिघे पंजाब बुडवतील…''

दरम्यान, पंजाबमध्ये विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द करण्यात निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षभराच्या काळात शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी अनेक प्रयत्नही केले गेले. शेतकऱ्यांनी आज घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे त्यांचाा पंतप्रधांवर असलेला राग अद्यापही निवळला गेला नसल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.