AAP News : मारहाण करत, गनपॉईंटवर सही घेतात ईडी अधिकारी भानुप्रिया; 'आप'चा तपास यंत्रणावर खळबळजनक आरोप !

Aam Adami Party : तुम्हाला पुढे देखील नोकरी करायचे आहे, अधिकाऱ्यांना आपचा इशारा..
Sanjay Singh
Sanjay Singh Sarkarnama

'AAP's sensational accusation against the investigation : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याचं कथन संपण्याचं चिन्हे दिसत नाही. आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा दारू घोटाळा धादांत खोटा असल्याचे म्हंटले आहे. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आप नेते संजय सिंह यांनी केला आहे.

ईडी आणि सीबीआय या यंत्रणा 'बंदुकीच्या जोरावर' साक्षीदारांचे हवं ते वदवून घेत असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे. धमकावून, दमदाटी करून, सह्या घेऊन तुरूंगात टाकले जात आहे. आपल्याकडे याचे पुरावे असल्याचे दावा करत, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ईडीच्या महिला अधिकारी भानुप्रिया यांच्यावर मारहाण केल्याचा आणि लेखी निवेदनांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. याचे पुरावे आपण न्यायालयाच्या पुढे ठेवू, असे सांगत आपच्या खासदारांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला.

Sanjay Singh
Karnataka MLA Photo's : सर्वाधिक मतांनी निवडून आलेले कर्नाटकचे टॉप दहा आमदार; पाहा फोटो!

संजय सिंह म्हणाले, 'म्हणजे तीन मोठे पात्र आहेत. संजय मिश्रा हे ईडीचे संचालक आहेत, भानुप्रिया एक महिला अधिकारी आहेत, अनमोल सचान हे तिसरे सीबीआय अधिकारी आहेत. हे अधिकारी किती मोठे गुन्हेगारी कृत्य करत असतील याची तुम्ही कल्पना करू शकता. मी सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी 75 वर्षांनी निवृत्त होणार आहेत, तुम्हाला पुढे काम करावे लागेल. न्याय करा, कर्तव्य प्रामाणिकपणे करा. धमक्या देणे बंद करा. तुमची मुलगी कॉलेजला कशी जाईल? अशा धमक्या देणे बंद करा.

Sanjay Singh
Gautami Patil Photo's : गौतमी पाटीलचं उदयनराजेंना खास 'गिफ्ट'; पाहा भेटीचे स्पेशल फोटो!

संजय सिंह यांनी ईडीच्या महिला अधिकारी भानुप्रिया यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की ईडी संचालकांच्या सांगण्यावरून त्या अधिकारी आरोपींना मारहाण करतात. लेखी निवेदनांवर जबरदस्तीने स्वाक्षरी करण्यास भाग पाडतात.

संजय सिंह म्हणाले, 'मला या तीन अधिकाऱ्यांना सांगायचे आहे, "माझ्याकडे काही पुरावे आले आहेत. योग्य वेळी ते उघड होईल. तुम्ही कशाप्रकारे तपास करत आहात याचे बरेच पुरावे आमच्याकडे आले आहेत. जोगेंद्र सिंग हे तपास अधिकारी आहेत, पण त्यांचं इथे काही चालत नाही. संजय मिश्रा यांच्या सांगण्यावरून भानू प्रियांना अशी मारहाण करा, अशी धमकी द्या, शिवीगाळ करा, अपमान करा असे सांगितले जाते.

Sanjay Singh
Nana Patole : फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट होती, ती आज खरी होताना दिसत आहे...

संजय सिंह म्हणाले की, "ईडी सीबीआयने यापूर्वी 100 कोटींचा घोटाळा असल्याचे सांगितले होते. मग 20-30 कोटींचे पुरावे असल्याचे सांगितले. आता 'आप'च्या प्रचारासाठी हवालाद्वारे 17 कोटी रुपये गोव्यात पाठवणाऱ्या आरोपींच्या अटकेबद्दल संजय सिंह म्हणाले, ' हा 17 कोटींचा आरोप आत्ताच दोन दिवसांपूर्वी सुरू झाले. एक वर्षभर 17 कोटींची चौकशी होणार आहे. सर्वांना धमक्या देऊन तुरुंगात डांबून ठेवा. या 17 कोटीच्या कथिक प्रकरणात तेच डावपेच, धमक्या आणि खोटी विधाने, असे संजय सिंह म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com