कोरोना चाचणीसाठी आधी जबरदस्ती अन् नंतर बेदम मारहाण (व्हिडीओ व्हायरल)

कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिकांना जबरदस्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नकार देणाऱ्या नागरिकांना मारहाणही करण्यात येत आहे.
bbmp officials force citizens of bengaluru to udergo coivid test
bbmp officials force citizens of bengaluru to udergo coivid test

बंगळूर : केंद्र सरकारने कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला असला तरी लस टंचाईमुळे नागरिकांना लस मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत आहेत. यातच लशीची रांग म्हणून कोरोना चाचणीच्या (Covid Test) रांगेत उभे राहणे एका तरुणाला महागात पडले आहे. कर्मचाऱ्यांनी चाचणी करण्यासाठी त्याला जबरदस्ती करीत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असा प्रकार तेथे सातत्याने सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. 

ही घटना बंगळूरमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मध्य बंगळूरमधील नागरथपेठमधील धर्मरायास्वामी मंदिराजवळ ही घटना घडली आहे. या ठिकाणी बंगळूर महापालिकेचे केंद्र आहे. या केंद्रासमोरील कोरोना चाचणी रांगेला लसीकरणाची रांग समजून एक तरुण उभा राहिला. नंतर त्याला कळाले की ती आरटी-पीसीआर चाचणीची रांग आहे. तो तेथून जाऊ लागला त्यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले. 

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला चाचणी करण्यासाठी जबरदस्ती केली. तो ऐकत नाही असे पाहून त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ उडाला आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी करण्यासाठी जबरदस्ती करतात, अशी तक्रारही परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

याची दखल अखेर बंगळूर महापालिकेने घेतली आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.शिवुकमार म्हणाले की, या घटनेची वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही घटना दुर्दैवी आहे. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिली असून, अशा प्रकारचे वर्तन न करण्याची ताकीद दिली आहे. लॉकडाउनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना चाचणी करण्यास सांगितले जात आहे. कोणावरही जबरदस्ती करु नये, असे बजावण्यात आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com