Documentary on Modi : मोदींवरील डॉक्युमेंट्रीला ABVP चे सडेतोड उत्तर ; 'द काश्मीर फाइल्स'..

PM Narendra Modi: अभाविपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
Narendra Modi
Narendra Modi sarkarnama

BBC Documentary on Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर बीबीसीनं (BBC) डॉक्यूमेंट्री केली आहे. या डॉक्युमेंट्रीवरुन वाद निर्माण झाला आहे. BBCने 17 जानेवारीला गुजरात दंगलीवरील डॉक्यूमेंट्री 'द मोदी क्वेश्चन'चा पहिला भाग यूट्यूबवर प्रसारित झाला आहे.

भारत सरकारने ही डॉक्यूमेंट्री पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाविरोधातील अपप्रचार असल्याचा दावा केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची याविषयी म्हणाले की, या डॉक्यूमेंट्रीमागे कोणता अजेंडा आहे हे आम्हाला माहिती नाही. पण ही निष्पक्ष नाही. हा पंतप्रधान मोदींविरोधातील अपप्रचार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंट्री ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ही काल (गुरुवारी) हैदराबाद विद्यापीठात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ने 400 हून अधिक विद्यार्थ्यांसमोर दाखवली. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

Narendra Modi
Vishal Dhume News : निलंबित एसीपी ढुमेंचे अजब किस्से; दारू, चिकन-बिर्याणीवाले तर होतेच; दूधवालादेखील सोडला नाही

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. एसएफआयला (SFI) प्रत्युत्तर देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) पुढे सरकारवली आहे. या डॉक्युमेंट्रीला सडेतोड उत्तर देण्यासाठी ABVP व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)ने विद्यापीठाच्या परिसरात 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट दाखवला. त्यामुळे या संघटनामध्ये वाद निर्माण झाला आहे.

विद्यापीठातील बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगचा फोटोही एसएफआयने आपल्या सोशल मीडियावर शेअर पोस्ट केला. या पोस्टमध्ये एसएफआयने ABVP ला डिवचण्याच्या प्रयत्न केला आहे.

Narendra Modi
BJP News : धक्कादायक ; फेसबूक पोस्ट शेअर करीत भाजप नेत्यानं कुटुंबासह जीवन संपवलं..

या BBC डॉक्यूमेंट्रीवरील वादात अमेरिकेने 48 तासांत आपली भूमिका बदलली आहे. अमेरिकेने माध्यम स्वातंत्र्याचा दाखला देत BBC डॉक्यूमेंट्रीची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी डॉक्यूमेंट्रीवर निर्बंध लादण्याचा मुद्दा माध्यम स्वातंत्र्याशी जोडला आहे. ते म्हणाले - संपूर्ण जगात फ्रीडम ऑफ स्पीचचे महत्त्व अधोरेखित करण्याची ही योग्य वेळ आहे. हे भारतावरही लागू होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com