पटियाला हिंसाचाराचा सूत्रधार बरजिंदर सिंग परवाना'ला अटक

Patiala Violen| Barjinder Singh Parwana | Chandigadh| परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याबद्दल आणि हिंसाचार भडकावल्याबद्दल चंंडीगड पोलिसांनी शिवसेनेच्या हरीश सिंग यालाही अटक केली आहे.
पटियाला हिंसाचाराचा सूत्रधार बरजिंदर सिंग परवाना'ला अटक

नवी दिल्ली : पंजाबमधील पटियाला हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार बरजिंदर सिंग परवाना याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आज त्याला न्यायालयात हजर करणार आहेत. पंजाबच्या पटियाला (Patiala Violence) येथे शुक्रवारी काही शीख तरुण आणि शिवसैनिकांमध्ये (Shiv Sena) मोठा वाद उफाळला होता. या हिंसाचाराप्रकरणी चंडीगड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण:

पटियालामध्ये बंदी घातलेल्या खलिस्तानी या दहशतवादी संघटनेविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेनेने निलंबित केलेला हरीश सिंह याने पटियालामध्ये खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढला होता. यावेळी दोन गटात मोठा हिंसाचार उफाळला. सिंह यांचा गट आणि शिख समुदायातील लोकांचा एक गट काली माता मंदिराबाहेर समोरासमोर आला. एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी तलवारी काढल्या. यावेळी मोठी दगडफेक झाली. या दगडफेकीत काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करावा लागला.

पटियाला हिंसाचाराचा सूत्रधार बरजिंदर सिंग परवाना'ला अटक
भाजप आणि राष्ट्रवादीचं ठरलं होतं पण शिवसेनेला काहीच माहिती नव्हतं!

या हिंसाचाराप्रकरणी पटियाला रेंजचे नवे आयजी मुखविंदर सिंग छिना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बरजिंदर सिंग परवाना हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्यावर यापूर्वी 4 एफआयआर दाखल आहेत. या हिंसाचार प्रकरणी शनिवारी (३० एप्रिल) पोलिसांनी दलजीत सिंग आणि कुलदीप सिंग या आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच, परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याबद्दल आणि हिंसाचार भडकावल्याबद्दल चंंडीगड पोलिसांनी हरीश सिंग यालाही अटक केली आहे. या हिंसाचाराच्या घटनेची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हरीश सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

कोण आहे बरजिंदर सिंग परवाना

- बरजिंदर सिंग परवाना हा राजपुरा येथील रहिवासी असून गगन चौकाजवळील गोविंदसिंग नगर येथे राहतो.

- बरजिंदर परवाना 2007-08 मध्ये सिंगापूरला गेला होता. 17-18 महिने सिंगापूरमध्ये राहिल्यानंतर तो भारतात परतला आणि धार्मिक वस्त्र परिधान करुन शिखांचा प्रचार करु लागला.

- पटियाला हिंसाचारापूर्वी बरजिंदर सिंग परवाना याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत.

- 2016 मध्ये बाणूर पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता. खुनी हल्ल्याप्रकरणी एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

- दुसरा गुन्हा 2019 मध्ये पटियालाच्या सदर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

- पटियाला येथील लाहोरी गेट पोलीस ठाण्यात बरजिंगर सिंग यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याच्यावर खुनी हल्ला आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप होता.

- 2021 मध्ये मोहालीमध्ये चौथा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी बलोंगी पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पोलिसांच्या तपासानुसार, परवाना गुरुद्वारातील अध्यक्षांविरोधात सतत आवाज उठवत आला आहे. शीख धर्माविरोधातील धरणे आंदोलनातही तो अनेकदा सहभागी होत असतो.

- बरजिंदर परवाना नेहमीच चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियावर चिथावणीखोर वक्तव्ये करत असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com