मोठी बातमी : सुशांत अन् रियामध्ये केवळ 55 लाखांचेच व्यवहार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तीन केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहेत. सुशांतच्या खात्यावरील कोट्यवधी रुपयांचा अपहार रिया चक्रवर्तीने केला, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता.
bank audit report shows only 55 lakhs rupees transaction between sushant and rhea
bank audit report shows only 55 lakhs rupees transaction between sushant and rhea

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या बँक खात्यांवरील कोट्यवधी रुपयांचा अपहार रिया चक्रवर्ती हिने केला, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी सुशांतच्या बँक खात्यांचे लेखापरीक्षण करण्यात आले आहे. मागील पाच वर्षांत सुशांतच्या खात्यांवरुन 70 कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. यात सुशांत आणि रिया यांच्यात केवळ 55 लाख रुपयांचेच व्यवहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांतच्या बँक खात्यांवरील कोट्यवधी रुपयांचा अपहार रियाने केला, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी पाटण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला होता. हा एफआयआर नंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. रियाने सुशांतचे सर्व पैसै काढून घेतले आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असाही आरोप करण्यात आला होता. यामुळे सुशांतच्या बँक खात्यांचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या बँक खात्यांच्या लेखापरीक्षणाचा अहवाल आता आला आहे. या अहवालानुसार, सुशांतच्या खात्यांवरुन मागील पाच वर्षांत सुमारे 70 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. यातील रियाशी निगडित व्यवहार केवळ 55 लाख रुपयांचे आहेत. हे व्यवहार प्रामुख्याने प्रवास, स्पा आणि गिफ्ट यासाठी झालेले आढळले आहेत. यामुळे रियाने सुशांतकडील सर्व पैसे काढून घेतल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा आरोप फोल ठरला आहे. याचबरोबर रियाने त्याला याच कारणामुळे आत्महत्येस प्रवृत्त केले असेही आता म्हणता येणार नाही. 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) पथकाने सुशांतच्या मृत्यूबाबत सीबीआयकडे अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आणि या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचणार आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू होती. 

सुशांतच्या शरीरावर गळफासाव्यतिरिक्त कोणतीही इतर जखम नव्हती. याचबरोबर त्याचा कोणाशी संघर्ष अथवा झटापट झाल्याच्याही शरीरावर कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. त्याच्या कपड्यांवरही अशा प्रकारच्या खुणा सापडलेल्या नाहीत, असे 'एम्स'च्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी स्पष्ट केले होते. यावर सीबीआयने खुलासा केला आहे. सीबीआयने म्हटले आहे  की, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. सर्व पैलू काळजीपूर्वक तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. नंतर सर्वोच्च  न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com