Mayawati : आगामी विधानसभा - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावतींची मोठी घोषणा

BSP : ''काँग्रेस आणि इतर काही पक्ष आमच्यासोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करतायेत''
Mayawati
Mayawati Sarkarnama

BSP News : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांनी मोठी घोषणा केलीय. आगामी निवडणुकीमध्ये बसपा कोणत्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करणार नाही, तर सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. लखनऊमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी मायावतींनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेस संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप केला. मायावती म्हणाल्या, ''त्यांच्या पक्षाने उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि पंजाबमध्ये आघाडीकरून निवडणूक लढवली. मात्र, अनुभव योग्य राहिला नाही.

त्यामुळे आता बसपा येणाऱ्या निवडणुका स्वबळावरच लढवणार आहे. तर काँग्रेस आणि अन्य काही पक्ष आमच्यासोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करतायेत. मात्र, आमची विचारधारा ही इतर पक्षांपेक्षा वेगळी आहे '', असं त्या म्हणाल्या.

Mayawati
Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीनं घेतला अचानक पेट

''येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होतील त्या बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात. या आधी ज्या निवडणुका ईव्हीएमद्वारे झाल्या. त्याबाबत लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बसपाची निवडणूक आयोगाकडे ही मागणी आहे की, येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरद्वारे घेतल्या जाव्यात.

ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप अनेक वेळा झाला आहे. बॅलेट पेपरच्यावेळी आमच्या जागांची संख्या आणि मतांची टक्केवारी वाढलेली असायची. त्यामुळे बॅलेट पेपरद्वारे मतदान घेणे गरजेचे आहे'', असं त्या म्हणाल्या.

Mayawati
Pankaja Munde News : पंकजाताईंचा होमपिचशी असलेला संपर्क तुटतोय...तर फडणवीसांचा ‘कनेक्ट’ वाढतोय....!

''बसपाला (BSP) पुढे जाण्यापासून काही पक्ष रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षणाबाबत सर्वच सरकारचा दृष्टिकोन हा योग्य राहिलेला नाही. आरक्षणाबाबत भाजप (BJP) देखील काँग्रेसच्याच (Congress) पावलावर पाऊल टाकत असल्याचं दिसत आहे. याचा येणाऱ्या स्थानिक निवडणुकांवर परिणाम पाहायला मिळणार आहे'', असं त्या म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका 'बसपा' स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in