भाजपनं तिसऱ्यांदा मुलाला तिकीट नाकारताच येडियुरप्पा म्हणाले...

भाजपनं सलग तिसऱ्यांदा येडियुरप्पांच्या मुलाचं तिकीट कापलं
B. S. Yediyurappa and Son B.Y. Vijayendra, BJP News, Karnataka News, B. S. Yediyurappa News
B. S. Yediyurappa and Son B.Y. Vijayendra, BJP News, Karnataka News, B. S. Yediyurappa NewsSarkarnama

बंगळूर : विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजपमधील (BJP) मतभेद समोर आले आहेत. माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राज्य भाजपने एकमुखाने विजयेंद्र यांच्या नावाची शिफारस दिल्लीकडे केली होती. तरीही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या शिफारशीला केराची टोपली दाखवली आहे. यावर येडियुरप्पांनी आता 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. (B. S. Yediyurappa News)

लवकरच मोठी जबाबदारी विजयेंद्र यांच्यावर सोपवली जाणार आहे, असे भाकित येडियुरप्पांनी वर्तवले आहे. ते म्हणाले की, विजयेंद्र यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारण्याचे काही वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. भविष्यात त्यांना अधिक मोठी संधी दिली जाईल, यावर माझा विश्वास आहे. ते सध्या पक्षाचे उपाध्यक्ष असून, त्यांना आणखी संधी मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यावर माझा भरवसा आहे. लवकरच काही बदल होतील आणि विजयेंद्र यांना आणखी संधी मिळेल, असाही विश्वास मला आहे. पक्षाने निष्ठावंत आणि कार्यक्षम नेत्यांन कधीही बाजूला केलेलं नाही.

येडियुरप्पांनी भाजप नेतृत्वावर फारशी टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यामागे विजयेंद्र यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचबरोबर पुढील वर्षी कर्नाटकात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विजयेंद्र यांना उमेदवारी देण्याचा शब्द भाजप नेतृत्वाने येडियुरप्पांना दिल्याचे समजते. येडियुरप्पांनी याआधी अनेक वेळा पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले होते. मात्र, या वेळी मात्र, त्यांनी 'वेट अँड वॉच' भूमिका घेतली आहे.

B. S. Yediyurappa and Son B.Y. Vijayendra, BJP News, Karnataka News, B. S. Yediyurappa News
श्रीलंकेचा पाय खोलात जाताच खुद्द पंतप्रधानांनीच हाती घेतलं अर्थ खाते

कर्नाटकात विधान परिषदेच्या सात जागांसाठी 3 जूनला निवडणूक होत आहे. यातील चार जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी यादी जाहीर केली असून, यात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्ण सवदी, पक्षाच्या सरचिटणीस हेमलता नायक, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष चलवादी नारायणस्वामी आणि एस.केशवप्रसाद यांचा समावेश आहे. मात्र, यात येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र यांचे नाव नाही. मागील काही दिवसांपासून विजयेंद्र यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण ऐनवेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना तिकीट नाकारून येडियुरप्पांनाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या कोअर समितीने विजयेंद्र यांच्या नावाची एकमताने शिफारस करुनही त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.

B. S. Yediyurappa and Son B.Y. Vijayendra, BJP News, Karnataka News, B. S. Yediyurappa News
गुजरातमध्ये काँग्रेसला दुसरा धक्का! हार्दिक पटेल यांच्यानंतर आणखी एका नेत्याचा रामराम

विजयेंद्र यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण राज्याच्या कोअर समितीने त्यांचे नाव सुचवले होते. विजयेंद्र यांची उमेदवारी कापण्यात आल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. यानंतर विजयेंद्र यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. सत्ता आणि पदे ही राजकारणात कायमची नसतात, असे सूचक संदेश त्यांनी दिला आहे. येडियुरप्पा आणि माझ्या भावनांचा विचार करून कार्यकर्त्यांनी पक्षावर टीका करू नये, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. पक्षासाठी योगदान देणाऱ्यांना पक्ष डावलणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in