मुख्यमंत्र्यांचे पद जाताच 'पीए' बनला बसचा कंडक्टर कम ड्रायव्हर!

बंगळूर महानगर परिवहन महामंडळाच्या सेवेत उमेश यांना पुन्हा वाहक कम चालक म्हणून पाठवण्यात आले आहे.
B. S. Yediyurappa
B. S. Yediyurappa File Photo

बंगळूर : प्राप्तिकर विभागाने (Income Tax) माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांचे (B.S.Yediyurappa) स्वीय साहाय्यक एम.आर. उमेश (M.R.Umesh) यांच्या घर व कार्यालयावरही छापा घालण्यात आला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता उमेश यांना बंगळूर महानगर परिवहन महामंडळाच्या (BMTC) सेवेत पुन्हा वाहक कम चालक म्हणून पाठवण्यात आले आहे.

येडियुरप्पांचे पीए उमेश हे शिमोगा जिल्ह्यातील आयनूरचा रहिवासी आहेत. ते सुरवातीला बीएमटीसीमध्ये वाहक कम चालक म्हणून काम करीत होते. यलहंका येथील पुट्टेनहळ्ळी बीएमटीसी डेपोत ते काम करीत होते. नंतर त्यांनी आमदार अय्यनूर मंजुनाथ यांचे स्वीय सहायक म्हणून काही काळ काम करीत होते. येडियुरप्पांचे स्वीय सहायक म्हणून ते 2012 पासून काम करीत होते. विजयेंद्र यांचेही ते निकटवर्ती होते. उमेश यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

बीएमटीसीने मुख्यमंत्री कार्यालयातील उमेश यांची प्रतिनियुक्ती रद्द केली. कारण उमेश हे केवळ येडियुरप्पांनी सांगितले होते की उमेश हे केवळ आपल्यासाठीच नव्हे तर विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासाठीही काम करीत आहेत. अखेर उमेश यांनी पुन्हा बीएमटीसीच्या सेवेत बोलावून घेत आहेत. नियमानुसार प्रतिनियुक्तीवर केवळ 2 ते 5 वर्षे राहू शकता येते परंतु, उमेश हे दशकभराहून अधिक काळ मुख्यमंत्री कार्यालयात होते.

जलसंपदा विभागातील निविदा वाटपात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी मध्यस्थ, कंत्राटदार आणि कंपन्यांवर छापे टाकले. प्राप्तिकर विभागाच्या बंगळूर आणि गोवा कार्यालयातील तीनशेहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे छापे घातले. जलसंपदा विभागातील सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल छापे घालण्यात आले. जलसंपदा विभागाची कंत्राटे देताना मोठा भ्रष्टाचार होत आहे. यात येडियुरप्पांची पीए उमेश हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. उमेश यांनी या माध्यमातून अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचे कमिशन गोळा केल्याचाही संशय आहे.

B. S. Yediyurappa
नवीन मुख्यमंत्र्यांचीही पडणार विकेट? सिद्धूंची मोहीम सुरू (व्हिडीओ व्हायरल)

उमेश यांच्यावरील छाप्याने येडियुरप्पा हे नाराज झाले आहेत. उमेश यांच्यासह काही कंत्राटदार, चार्टर्ड अकाउंटंट, बांधकाम साहित्याचे व्यापारी आणि येडियुरप्पांचे पुत्र बी.विजयेंद्र यांच्या जवळच्या काही व्यक्तींवर छापे घालण्यात आले. बंगळूरसह, बागलकोट, तुमकूर येथे छापे घालण्यात आले. यात कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत.

B. S. Yediyurappa
आरोपी पोलिसांसमोर हजर अन् काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी संपवलं उपोषण

राज्यात प्राप्तिकर विभागाने घातलेल्या छाप्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, राज्यभरात प्राप्तिकर विभागाचे छापे पडल्याची माहिती मिळाली आहे. या छाप्याशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. अधिक माहिती हाती आल्याशिवाय मी यावर अधिक बोलू शकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com