बालेकिल्ल्यात जाऊन उत्तर प्रदेशातील बडा नेता देणार योगींना टक्कर

योगी आदित्यनाथ हे गोरखपूर (शहर) मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार आहेत.
Chandrashekhar Aazad, Yogi Adityanath
Chandrashekhar Aazad, Yogi AdityanathSarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे गोरखपूर (शहर) मतदारसंघातून विधानसभा निवडणूक (Assembly elections) लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात समाजवादी पक्षाकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. पण भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे योगींना टक्कर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत (UP Election 2022) आजाद समाज पार्टीकडून चंद्रशेखऱ आझाद (ChandraShekhar Aazad) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या पक्षाकडून आतापर्यंत 33 जणांची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. सुरूवात आझाद व समाजवादी पक्षामध्ये आघाडी होणार असल्याची चिन्ह होती. पण अखेरच्या टप्प्यात आझाद यांनी स्वतंत्रपुणे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. तसेच आता ते थेट योगींच्या बालेकिल्ल्यात जाऊत त्यांना आव्हान देणार आहे.

Chandrashekhar Aazad, Yogi Adityanath
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

आजाद समाज पार्टी मागील दोन वर्षांपासून राजकारणात आहे. 2020 मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकीतही या पक्षाने ताकद दाखवली आहे. काही जागांवर या पक्षाने तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहे. असे असले तरी उत्तर प्रदेशातील त्यांची ताकद कमी आहे. योगी हे गोरखपुर मतदारसंघातून पाचवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.

आझाद यांनी 2015 मध्ये भीम आर्मी या संघटनेची स्थापना केली आहे. त्यांनी विधी शाखेची पदवी घेतली आहे. मे 2017 मध्ये शब्बीरपूर गावांत झालेल्या जातीय दंगल झाल्यानंतर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले होते. यावेळी त्यांना अटक झाली होती. तुरूंगात बाहेर पडल्यानंतरही त्यांनी दलितांसाठी लढा उभारला आहे. उत्तर प्रदेशसह इतर काही राज्यांमध्येही त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत.

Chandrashekhar Aazad, Yogi Adityanath
माजी सरपंचाकडून गर्भवती वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी योगींवर डाव टाकला आहे. त्यांनी गोरखपूरमधील विद्यमान आमदारालाच खुली ऑफ दिली आहे. योगींनी गोरखपूरमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील विद्यमान भाजप आमदार राधामोहन अगरवाल यांचा पत्ता कट झाल्याचे मानले जात आहे. यामुळे अखिलेश यादवांनी अगरवाल यांना खुली ऑफर दिली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, पत्रकारांनी अगरवाल यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्याशी बोलावे. त्यांना आम्ही गोरखपूरमधून तिकिट जाहीर करतो. त्यांना हे तिकिट नक्की मिळेल. योगी आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी मला अजूनही आठवतो. अगरवाल यांना बसायला जागा मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना उभेच राहावे लागले होते. भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक अपमानित होणारे अगरवालच आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com