Atique Ahmad News: आतिकला आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती; 28 मार्चला काय घडलं होतं...?

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी (१५ एप्रिल) माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली.
Atique Ahmad
Atique AhmadSarkarnama

Atique Ahmad News Update उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी (१५ एप्रिल) माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली. पोलीस वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी दोन्ही भावांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.अहमद यांचा मुलगा असद दोनच दिवसांपूर्वी झाशी येथे पोलिस चकमकीत मारला गेला. (Atique Ahmed knew in advance that he would be killed; What happened on March 28)

या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अतिक अहमदला आधीच आपली हत्या होण्याची भीती होती, त्यामुळे त्याने 18 दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 28 मार्च रोजी अतिक अहमदने दाखल केलेल्या याचिकेत, आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने त्याची ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्याची 15 एप्रिलला हत्या झाली.

Atique Ahmad
NCP News : मोठी बातमी : भाजपचे पाच आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ; प्रदेशाध्यक्षांचा दावा

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडली. पोलिसांनी दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेत असताना प्रसारमाध्यमं त्यांच्यासोबत फिरत असताना कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. पत्रकार अतीक अहमद यांना काही प्रश्न विचारत असताना केल्विन हॉस्पिटलच्या आपत्कालीन औषध विभागासमोर अतीक आणि अश्रफ यांना तीन तरुणांनी जवळून गोळ्या घालून हत्या केली.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथील घटनेची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी तीन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. हत्येनंतर यूपीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. राज्यातील प्रमुख ठिकाणे, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, राजकीय पक्षांची कार्यालये यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांना सतर्क राहून फ्लॅग मार्च काढण्यास सांगण्यात आले आहे.

अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. तर दोन दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाचा एनकाउंटर झाला होता. अतिक अहमद 2005 मध्ये बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातही प्रमुख आरोपी होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com