मोन्सेरात यांचं मोठं वक्तव्य; भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळला
Atanasio (Babush) MonserrateSarkarnama

मोन्सेरात यांचं मोठं वक्तव्य; भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळला

गोव्याच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर आणि भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्यातील लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली.

पणजी : गोव्याच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) आणि भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात (Atanasio Monserrate) यांच्यातील लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत मोन्सेरात यांनी बाजी मारत विजय मिळवला असला तरी त्यांची नाराजी आता समोर आली आहे. त्यांनी उघडपणे भाजपवर गंभीर आरोप करत उघडपणे बंडाचं निशाण फडकावलं आहे. (Goa Election Update)

पणजी (Panaji) मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढलेले उत्पल पर्रीकर यांचा 674 मतांनी पराभव झाला आहे. त्यांना 5857 मते मिळाली आहेत. मोन्सेरात यांना 6531 मते मिळाली आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार ईल्विस गोम्स हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना 3062 मते मिळाली आहेत. मोन्सेरात यांनी विजयासाठी सुरूवातीपासूनच झगडावे लागल्याचे प्रत्येक फेरीत दिसून येत होते. त्यामुळेच विजय मिळवूनही नाराज असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झालं आहे. (Political news updates)

Atanasio (Babush) Monserrate
आदित्य ठाकरेंनी सभा घेतलेल्या मतदारसंघातच शिवसेनेचा फुसका बार

माध्यमांशी बोलताना मोन्सेरात यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, निकाल ज्यापध्दतीने लागला आहे, त्यावरून निराश झालो आहे. भाजप (BJP) केडरने माझ्यासाठी काम न करता विरोधी उमेदवारासाठी काम केलं. माझ्या पत्नीविरोधातही भाजप कार्यकर्ते होते. मी काँग्रेससह भाजपशीही लढलो. काही कार्यकर्ते आणि समर्थकांच्या सहकार्यामुळे पुन्हा विजय मिळवणे शक्य झाले, असं मोठं वक्तव्य मोन्सेरात यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामागे पर्रीकर यांना मिळालेल्या भरघोस मतांचे कारण असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात मोन्सेरात यांचा दबदबा असून त्यांना झगडावे लागले. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत भाजपला एकप्रकारे इशाराच दिला आहे.

पर्रिकरांना मतदारांनी नाकारलं

गोवा भाजप म्हणजे मनोहर पर्रिकर हे समीकरण होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपदाची धुरा प्रमोद सावंत यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पर्रिकर यांच्याशिवाय होणारी ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष गोव्याच्या निवडणुकीकडे लागले होते. दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल यांनी पणजीतून भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, गोव्याचे प्रभारी असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल यांना दुसऱ्या मतदारसंघाचा पर्याय देत पणजीतून उमेदवारी नाकारली होती. मनोहर पर्रीकर यांचे निधन आणि भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे उत्पल यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. मात्र, सहानुभूतीचे रुपांतर मतात होऊ शकले नसल्याचे दिसून येत आहे.

या सर्व घडामोडीत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. त्यांनी आपली सर्व ताकद भाजपत आलेल्या मोन्सेरात यांच्या पाठीशी लावत त्यांना जिंकून आणले आहे, त्यामुळे उत्पल पर्रीकर यांना पराभावाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, फडणवीस यांनी बिहारपाठोपाठ गोव्यात भाजपला सत्तेत आणल्यामुळे त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in