
India -China Latest news : अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पुन्हा एकदा भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी चमकम झाल्याची माहिती समोर आली आहे. ९ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले आहे. भारतीय सैन्याच्यासहा जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे चिनी सैनिक भारतीय लष्कराची चौकी हटवण्यासाठी आले होते. पण भारतीय सैनिकांच्या तत्परतेने चिनी सैनिकांचे मनसुबे उद्ध्वस्त केले. या चकमकीत दोन्ही सैन्याचे काही जवान जखमी झाले. दरम्यान, भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती त्या ठिकाणचा सॅटेलाइट फोटो समोर आला आहे. तवांगच्या सीमेजवळ चीनने गावे बांधल्याचे सॅटेलाइट फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. एवढेच नाही तर त्या बाजूला चिनी सैन्याने रस्ताही बांधला आहे.
चिनी सैनिकांचा हा हल्ला सुनियोजित कट असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय जमीन बळकावण्यासाठी चीनचे सैन्य 300 सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. चिनी सैनिकांकडे काठ्या आणि खांबही होते. मात्र भारतीय सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याचे लक्षात आल्यानंतर दोन्ही सैन्यात चकमक झाली. चिनी सैनिकांनीही दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. भारताच्या 6 जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे.
1 मे 2020 रोजी पूर्व लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही बाजूचे अनेक सैनिक जखमी झाले होते. तेव्हापासून दोन्गी देशात तणावाचे वातावरण वाढले. यानंतर 15जून 2020 रात्रीही गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले होते
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.