गुजरातमध्ये राजकारण तापलं; काँग्रेस आमदार जिग्नेश मेवानींना मध्यरात्री अटक

Congress | jignesh Mevani : आसाम पोलिसांनी कारवाई केल्याने खळबळ
jignesh Mevani
jignesh Mevani Sarkarnama

अहमदाबाद : गुजरातमधील (Gujrat) काँग्रेसचे (Congress) आमदार जिग्नेश मेवानी (jignesh Mevani) यांना गुरुवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. आसाम (Aasam) पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या अटकेचे कारण अद्याप अस्पष्ट असून आसाममध्ये दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मेवानी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, अटकेची कारवाई करताना त्यांना एफआयआरची कॉपी देण्यात आली नाही, मात्र दाखल गुन्ह्याची माहिती दिली.

वडगाममधील पालनपूर सर्किट हाऊसमध्ये त्यांच्यावर मेवानी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून रात्रीच त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले होते. तिथून रेल्वेने आज त्यांना आसाममधील गुवाहाटीला नेण्यात येणार आहे. अटकेनंतर बोलताना मेवानी म्हणाले, एका ट्वीटमुळे अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही. माझ्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली असून मी घाबरणार नाही. मी माझी लढाई सुरू ठेवणार आहे.

jignesh Mevani
संजय राठोडांचे कारनामे बघून मुख्यमंत्री ठाकरेही झाले चकित!

मेवानी यांच्या अटकेची माहिती मिळताच गुजरातमधील राजकीय वातावरण तापलं असून काँग्रेसने या कारवाईची निषेध केला आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि मेवाणी समर्थकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. मेवानी अहमदाबादमध्ये पोहचातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांच्यासह अनेक आमदार अहमदाबाद विमानतळावर पोहचले. या सर्वांनी रात्रभर जिग्नेश मेवाणींच्या समर्थनात आणि आसाम पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान ठाकोर यांनी आरएसएसविरोधात ट्वीट केल्याबद्दल मेवानी यांना अटक करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com