Bachchu Kadu : बच्चू कडूंमुळे विधानसभेत गदारोळ ; राज्यपालांनी भाषणं थांबवलं..

MLA Bachchu Kadu Statement on Assam : भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये सोडा..
Bachchu Kadu
Bachchu Kadu Sarkarnama

MLA Bachchu Kadu Statement on Assam : अर्थसंकल्पीय अधिवेशनात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना आसाममध्ये लोक कुत्रे खातात असं विधान केलं. यानंतर आसाममधील विधानसभेत जोरदार गदारोळ झाला आहे. बच्चू कडूंच्या अटकेचीही मागणी पुढे आली.

काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडूंनी भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये सोडा असे विधान केले होते, याचे पडसाद आसामच्या विधानसभेत उमटले आहेत.

'बच्चू कडूंनी आसामच्या विधानसभेत येऊन जाहीर माफी मागावी' अशी मागणी आसामच्या काही आमदारांनी केली आहे. त्यामुळे या वादाची आता चांगलीच चर्चा होत आहे. यावरुन राजकारण पेटलं आहे.

“आसामबद्दल इतकं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सरकार यावर शांत का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. आसाममधील विरोधी पक्षातील आमदारांनी हे वक्तव्य करणाऱ्या बच्चू कडूंना अटक करा, अशी मागणी केली.

Bachchu Kadu
Sanjay Raut : राऊताचं नवं टि्वट ; मुश्रीफांचा फोटो पोस्ट ; "उद्या देवेंद्रजीकडे .."

आमदार कडू यांच्या विधानावरुन आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गोंधळ झाला. यामुळे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांना त्यांचं भाषणदेखील थांबवावं लागलं होतं. काँग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

या वादानंतर आता बच्चू कडू यांनी याबाबत माफी मागितली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. बच्चू कडू म्हणाले, “नागालँडमधील लोक कुत्रे खातात. मला वाटलं आसाममधील लोक कुत्रे खातात. दोन्ही राज्ये जवळपासच आहेत. माझ्याकडून चुकून आसाम नाव घेतलं गेलं, तिथं नागालँड म्हणायला हवं होतं. एवढीच माझी चूक आहे. यामुळे त्या राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी माफी मागतो.”

Bachchu Kadu
Money Laundering कायद्यात बदल ; PMLA नुसार आता लष्करी अधिकारी, न्यायाधीशही...

काय म्हणाले होते बच्चू कडू..

"महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. आसाममध्ये लोक कुत्र्यांचे मांस खातात. तिथे या कुत्र्यांचा व्यापार होऊ शकतो. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली," असे वादग्रस्त विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in