नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभ वादात; हिसंक, आक्रमक सिंहाच्या रचनेवर आक्षेप

AShok Stambh news|PM Naredra Modi| दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनावरील विशालकाय अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले.
Ashok stambh controversy news updates, PM Naredra Modi latest Marathi news, Political news, Rajkiya Batmya
Ashok stambh controversy news updates, PM Naredra Modi latest Marathi news, Political news, Rajkiya Batmya

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नव्या संसद भवनावरील विशालकाय अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले. मात्र आता यावरुन नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. नव्या अशोक स्तंंभाबाबात सातत्याने प्रश्न उपस्थित होत असून राष्ट्रीय चिन्ह (अशोक स्तंभ) बदलण्यात आल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. विशेष म्हणजे सोशल मिडीयावरही अशोक स्तंभावरुन हॅशटॅग ट्रेंड होत आहे. (Ashok Stambh controversy news)

सोमवारी (११ जुलै) ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही या अनावरणाला घटनात्मक नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले. तर त्याचवेळी इतर पक्षांना कार्यक्रमाला निमंत्रित न केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. यानंतर आता आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी राष्ट्रीय चिन्ह (अशोक स्तंभ) बदलल्याचा आरोप केला आहे. एक ट्विट शेअर करत संजय सिंह यांनी, 'देशातील 130 कोटी भारतीयांना मला विचारायचे आहे की राष्ट्रीय चिन्ह बदलणाऱ्यांना “देशविरोधी” बोलायचे की नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. संजय सिंह यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, जुन्या अशोक स्तंभात सिंह गंभीर मुद्रेत जबाबदार शासकांसारखे दिसत आहेत. तर दुसरीकडे, नव्या संसदेच्या भवनावरील संसदेच्या छतावर राज्यकर्त्याच्या भी डरकाळ्यासारखा बनवण्यात आला आहे. (PM Naredra Modi latest Marathi news)

तर, तृणमुल कॉंग्रेसचे नेते जवाहर सरकार यांनीदेखील नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभाच्या प्रतिकृतींवर आक्षेप घेतला आहे. ट्विट करत त्यांनी मुळ अशोक स्ंतभ आणि नव्या संसदभवनावरील अशोक स्ंतभातील फरक अधोरेखित केला आहे. ''आमच्या राष्ट्रीय चिन्हाचा, भव्य अशोकस्तंभावरील सिंहाचा अपमान झाला आहे. मुळ अशोकस्तंभावरील सिंहांच्या प्रतिकृती या, सुंदर, प्रामाणिकपणे आत्मविश्वासपूर्ण आहेत. तर उजवीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आवृत्ती आहे, जी संसदेच्या नवीन इमारतीच्या वर ठेवली आहे - भयावह, अनावश्यक आक्रमक आणि विजोड अशी आहे. लाज बाळगा! ताबडतोब बदला! असे ट्विट करत जवाहर सरकार यांनी अशोक स्तंभावर आक्षेप घेतला आहे.

सोशल मिडीयावरही आता नव्या अशोक स्तंभावरुन रणकंदन माजले आहे. अशोक स्तंभ मत बदलो, असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहेत.

ट्विटर युजर रेखा मीना म्हणतात, ही सर्वात जुनी ऐतिहासिक स्मृती आहे, अस्मिता प्रतिष्ठेचे प्रतीक आहे, स्थिरता आणि विविधतेतील एकता समान रचनेत ठेवली पाहिजे, अगदी संविधानाच्या पुस्तकावर आणि सर्व कार्यालये इत्यादी देखील त्याच चिन्हाचे अनुसरण करीत आहेत.

अनुराग नहाता म्हणतात, मोदी सरकार राष्ट्रीय चिन्हांशी छेडछाड करत आहे, असे तुम्हालाही वाटते का? तर तुमचा आवाज वाढवा,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com