Rajasthan Politics: 'गेहलोत यांच्या नेत्या सोनिया गांधी नाही तर वसुंधराराजे'; आपल्याच सरकारविरोधात पायलट काढणार मोर्चा..

Ashok Gehlot Vs Sachin pilot : अजमेर ते राजस्थान सरकारविरोधात मोर्चा..
Ashok Gahlot - Sachin Pilot
Ashok Gahlot - Sachin PilotSarkarnama

Congress News : राजस्थान काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे युवा नते सचिन पायलट पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप केल्यानंतर पायलटने पलटवार केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या नेत्या सोनिया गांधी नसून वसुंधरा राजे आहेत असे वाटते. पायलट यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून 11 मेपासून पाच दिवसांची यात्रेची घोषणा केली. अजमेर ते जयपूर असा अशी ही त्यांची यात्रा असेल. पायलटने 5 दिवसात 125 किमी चालण्याची घोषणा केली. यापुढेही भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ashok Gahlot - Sachin Pilot
Mla Meghna Bordikar News : लंडनमधील भारतीयांकडून आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर...

पायलट म्हणाले, "मी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे धौलपूरमधील भाषण ऐकले, ते ऐकून असे वाटते की त्यांच्या नेत्या वसुंधरा राजे आहेत, सोनिया गांधी नाहीत. एकीकडे राज्यातील आमचे काँग्रेसचे सरकार पाडण्याचे काम भाजप करत असल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे आम्हाला वाचवण्याचे काम वसुंधरा राजे करत असल्याचासुद्धा दावा होत आहे. अशा गोंधळात न पडता तुम्हाला काय म्हणायचे आहे, ते स्पष्ट करा, असे बोलले जात आहे."

काँग्रेसच्या काही आमदारांनी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून पैसे घेतल्याचा अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचा आरोप पायलट यांनी फेटाळून लावला. यावर पायलट म्हणाले की, '30-40 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात असलेल्या लोकांवर काही पैशांसाठी विकल्याचा आरोप करणे चुकीचे आहे.' आरोप फेटाळून लावताना त्यांनी ज्येष्ठ नेते हेमाराम यांचे उदाहरण देत सार्वजनिक कामांसाठी प्रत्येकी 100 कोटी रुपयांची जमीन दान केल्याचे सांगितले. आमदारांनी पैसे घेतले तर तीन वर्षे कारवाई का झाली नाही, असा सवालही त्यांनी केला.

Ashok Gahlot - Sachin Pilot
Asim Sarode News: मुख्यमंत्री शिंदेंसह 16 जण अपात्र ठरले तर उर्वरित आमदारही...; सरोदेंनी वर्तवल्या 'या' चार शक्यता !

मागील काही घडामोडींचा संदर्भ देत सचिन पायलट (Sachin Pilot) म्हणाले की, 'आमदारांची बैठक होऊ दिली नाही, हा सोनिया गांधींचा (Sonia Gandhi) अवमान, अपमान आणि विश्वासघात आहे. आमदारांना त्यांच्या इच्छेविरुद्ध राजीनामे द्यायला लावले.' वसुंधरा राजे यांना काँग्रेस सरकारचे तारणहार असे वर्णन करण्याच्या गेहलोत यांच्या वक्तव्यावर पायलट म्हणाले की, 'माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचारावर सरकार कारवाई का करत नाही, हे आता त्यांना समजले आहे.'

Ashok Gahlot - Sachin Pilot
Akkalkot News : स्वामी समर्थ साखर कारखाना; चेअरमनपदी संजीव पाटलांची बिनविरोध निवड !

पायलट म्हणाले, 'गेल्या दीड वर्षांपासून मी पत्र लिहित आहे. वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात मी भ्रष्टाचाराचे आरोप केले, गेहलोतजींनी केले, जाहीर मंचावरून केले, पत्रकार परिषेदेतूनही गंभीर आरोप केले. मात्र त्याची चौकशी का होत नाही? तपास का झाला नाही हे मला आता समजले आहे. मी आता हताश आहे. पायलटने 5 दिवसांच्या जनसंघर्ष यात्रेची घोषणा करत, भ्रष्टाचाराविरोधात आणि तरुणांसाठी आवाज उठवतच राहणार असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com