पायलट यांनी केली हाय कमांडची दिशाभूल! नेत्याचा खळबळजनक आरोप

मोठा गाजावाजा करीत मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी राजस्थानमधील काँग्रेसचा अंतर्गत वाद संपत नसल्याचे चिन्ह दिसत नाही.
Rahul Gandhi and Sachin Pilot
Rahul Gandhi and Sachin Pilot Sarkarnama

जयपूर : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यात समेट झाल्यानंतर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. मोठा गाजावाजा करीत मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Reshuffle) झाला असला तरी राजस्थानमधील काँग्रेसचा अंतर्गत वाद संपत नसल्याचे चित्र आहे. आता गेहलोत यांच्या निकटवर्तीय नेत्याने पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री गेहलोत यांचे निकटवर्तीय आमदार रामकेश मीणा यांनी पायलट यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, पायलट यांनी पक्षाच्या हाय कमांडची दिशाभूल केली. त्यांच्यामुळेच बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात योग्य स्थान मिळाले नाही. त्यांनी आम्हाला तिकिटे मिळून नयेत, यासाठी हाय कमांडला फसवले. आमच्या सहकाऱ्यांनी बहुजन समाज पक्षाशी अपक्ष म्हणून लढून विजय मिळवला होता. पक्षाची धुरा गेहलोत यांच्या हातात असती तर काँग्रेसला 150 जागा मिळाल्या असत्या. पक्षाच्या हाय कमांडकडे जाऊन त्यांनी सरकारच्या कामात सातत्याने खोडा घालण्याचा प्रयत्न केला.

मंत्रिमंडळ विस्तारात 15 नवीन चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. यात पायलट समर्थक 5 मंत्र्यांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चार दलित, 3 आदिवासी, 3 महिला आणि अल्पसंख्याक समाजातील एकाला मंत्रिपद देण्यात आले आहे. विस्तारानंतर गेहलोत यांनी खातेवाटप जाहीर केले आहे. यात त्यांनी गृह व अर्थ ही महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत.

Rahul Gandhi and Sachin Pilot
ममतांचा दे धक्का! राहुल गांधींचे निकटवर्ती माजी खासदार करणार तृणमूलमध्ये प्रवेश

बी.डी.कल्ला यांनी शिक्षण खाते तर प्रसादीलाल मीणा यांना आरोग्य खाते देण्यात आले आहे. प्रमोद जैन भाया यांच्याकडील खाण व पेट्रोलियम खाते कायम ठेवण्यात आले आहे. लालचंद कटारिया यांच्याकडे कृषी तर उदयलाल अंजाना यांच्याकडे सहकार खात्याची धुरा देण्यात आली आहे. शांती धारिवाल यांच्याकडील संसदीय कामकाज खाते कायम राहिले असून, मंत्रालय कामकाज खाते सालेह मोहम्मद यांच्याकडे गेले आहे. विश्वेंद्रसिंह यांना मागील वर्षी मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला होता त्यांना पुन्हा पर्यटन खाते तर रमेश मीणा यांना पंचायत राज खाते देण्यात आले आहे. ब्रजेंद्र ओला यांना रस्ते वाहतूक, भजन लाल जाटव यांना सार्वजनिक बांधकाम आणि शकुंतला रावत यांना उद्योग खाते देण्यात आले आहे.

Rahul Gandhi and Sachin Pilot
भाजप सोडल्यानंतर दोनच महिन्यांत बड्या नेत्याची आमदारकी धोक्यात

मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील रिक्त पदे भरण्यास सुरवात होणार आहे. पायलट यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. सध्या रणदीप सुरजेवाला यांच्याकडे माध्यम प्रभारी, कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस अशी जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये सध्या एक व्यक्ती एक पद हे सूत्र स्वीकारण्यात आले आहे. पायलट यांना सरचिटणीस केल्यास त्यांच्यावर कोणत्या राज्याची जबाबदारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, त्यांच्यावर गुजरातची धुरा सोपवली जाईल, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com