मिशन फत्ते! अखेर 'त्या' सहा आमदारांना घेऊन चार्टर विमानानं मुख्यमंत्री थेट हॉटेलवर उतरले

राज्यसभा निवडणुकीमुळं प्रत्येक आमदाराचं वाढलं वजन
Ashok Gehlot with Congress leaders (File Photo)
Ashok Gehlot with Congress leaders (File Photo) Sarkarnama

जयपूर : राज्यसभा निवडणुकीमुळं वातावरण तापलं असून, राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. राजस्थानमध्ये भाजपने (BJP) उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांना पाठिंबा देऊन मैदानात उतरवलं आहे. यानंतर तातडीनं काँग्रेसच्या (Congress) सगळ्या आमदारांना रिसॉर्टवर हलवण्यात आलं. पण एका मंत्र्यासह सहा आमदार गायब झाल्यानं काँग्रेसचं टेन्शन वाढलं. अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी त्या सहा जणांना घेऊन थेट . (Rajya Sabha Election News Updates)

काँग्रेसनं आपल्या आमदारांना उदयपूरमधील रिसॉर्टवर हलवलं. त्यावेळी एका मंत्र्यासह सहा आमदार त्यात नव्हते. या आमदारांना रिसॉर्टवर दाखल होण्याचा आदेश पक्षाने दिलेला होता. यासाठी त्यांना अंतिम मुदतही देण्यात आली होती. तरीही हे आमदार रिसॉर्टवर पोचले नव्हते. हे आमदार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मत देण्याची भीती काँग्रेसला होती. अखेर मुख्यमंत्री गेहलोत यांनीच सारी सूत्रे हाती घेतली. त्यांनी या सहा आमदारांची भेट घेतली. या भेटीनंतर चार्टर विमानाने या आमदारांना सोबत घेऊनच गेहलोत हे हॉटेलवर परतले. यामुळं काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा जीव भांड्यात पडला आहे.

Ashok Gehlot with Congress leaders (File Photo)
घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसनं टाकला डाव अन् भाजपचीही केली कोंडी

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) चार जागा आहेत. यातील दोन जागा काँग्रेस आरामात जिंकू शकते तर भाजपला एक जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. तिवारी यांच्या बाहेरचा असा शिक्का राज्यातील काँग्रेस नेते मारत आहेत. तिवारींच्या उमेदवारीबद्दल पक्षातील नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. यातच आता भाजपने सुभाष चंद्रा यांना पाठिंबा देत मैदानात उतरवून काँग्रेसला धक्का दिला आहे. चंद्रा हे झी माध्यम सूमहाचे मालक असून, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

Ashok Gehlot with Congress leaders (File Photo)
महाडिकांच्या गळाला एकदम तीन आमदार? मतांच्या गोळाबेरजेसाठी थेट हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला

राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेसला तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी 15 मतांची आवश्यकता आहे. याचवेळी भाजपला एका जागेवर विजय मिळवून दुसऱ्या जागेसाठी 11 मतांची आवश्यकता असेल. चंद्रा हे भाजपच्या पाठिंब्यावर मैदानात उतरले असून, घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात 13 अपक्ष आमदार असून, छोट्या पक्षांचे 8 आमदार आहेत. त्यातील 12 अपक्षांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. काँग्रेसने आपले आमदार फुटू नयेत, यासाठी त्यांना जयपूरमधून उदयपूर येथील रिसॉर्टवर हलवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in