ओवेसींची तमिळनाडूच्या आखाड्यात उडी; दिनकरन यांच्यासोबतच्या आघाडीने सत्ताधाऱ्यांना घाम

तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे वातावरण तापले आहे. ओवेसी यांनी आता राज्यातीलमैदानात उडी घेतली आहे.
asaduddin owaisi will contest tamil nadu election with t t v dinakaran
asaduddin owaisi will contest tamil nadu election with t t v dinakaran

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. त्यांचे पुतणे आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी मात्र, मागे न हटता निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. आता त्यांना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची साथ मिळाली आहे. या आघाडीचा सर्वाधिक फटका सत्ताधारी अण्णाद्रमुकला बसण्याची चिन्हे आहेत.  

शशिकलांच्या निवृत्तीचा सर्वांत मोठा धक्का त्यांचे भाचे  व अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) पक्षाचे प्रमुख दिनकरन यांना बसला होता. यानंतरही मागे न हटता दिनकरन यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. दिनकरन यांच्या पक्षासोबत आता ओवेसींच्या एआयएमआयएमने आघाडी केली आहे. ओवेसींचा पक्ष तमिळनाडूत तीन जागा लढवणार आहे. यात वनियांम्बदी, कृष्णगिरी आणि शंकरपूरम या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. तमिळनाडूत 6 एप्रिलला विधानसभा निवडणूक होत आहे.  

शशिकला आणि दिनकरन यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी झाली होती. त्यावेळी दिनकरन यांनी स्व:तचा एएमएमके पक्ष स्थापन केला होता. त्यांनी जयललितांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर.के.नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ती जिंकून त्यांनी अण्णाद्रमुकला मोठा धक्का दिला होता. याचबरोबर मागील लोकसभा निवडणूकही त्यांच्या पक्षाने लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नव्हती मात्र, त्यांच्या पक्षाच्या मतांचा टक्का 8.46 टक्के होता. त्यांचे उमेदवार राज्यात तिसऱ्या स्थानी होते. त्यांनी प्रामुख्याने अण्णाद्रमुकची मते खाल्ली. 

दिनकरन यांचा पक्ष विधानसभा निवडणुकीतही प्रामुख्याने अण्णाद्रमुकची मते खाणार आहे. त्यांच्यासोबत ओवेसी आल्याने त्यांना आणखी बळ मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. भाजपने हा धोका आधीच ओळखून दिनकरन यांना सोबत घ्यावे, यासाठी अण्णाद्रमुकवर दबाव आणला होता. परंतु, मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी याला स्पष्ट नकार दिला होता. आता शशिकला यांनी राजकीय निवृत्ती घेतली असली तरी आगामी काळात त्या भाच्याचा बाजूने पडद्यामागून सूत्रे हलवू शकतात, अशीही शक्यता आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com