माझी भाभी एकटी गुजरातमध्ये राहतेय पण कुणीही तिच्याबद्दल बोलत नाही!

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
asaduddin owaisi targets prime minister narendra modi
asaduddin owaisi targets prime minister narendra modi

लखनौ : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तोंडी तलाकवर बोलणारे हिंदू पुरूषांकडून सोडल्या जाणाऱ्या महिलांबद्दल काही बोलत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. माझी भाभी (मोदींच्या पत्नी) एकटी गुजरातमध्ये राहतेय पण तिच्याबद्दल कुणी बोलत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

ओवेसी हे तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. यात ओवेसी यांचा पक्ष सुमारे 100 जागा लढवणार आहे. एमआयएमने काढलेल्या रॅलीत ओवेसी सहभागी झाले होते. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून देशाचा धर्मनिरपेक्ष ढाचा उद्‌ध्वस्त करून हिंदू राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, आरोप ओवेसी यांनी केला. 

कटरा चंदना येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या रॅलीत मोठी गर्दी झाली होती. ओवेसी म्हणाले की, तोंडी तलाकमुळे मुस्लिम महिलांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल भाजप नेते वारंवार बोलत असतात. परंतु, पुरुषांनी टाकून दिलेल्या हिंदू महिलांबद्दल भाजप नेते मौन धारण करतात. माझी भाभी (मोदींच्या पत्नी) गुजरातमध्ये एकट्या राहत आहेत. परंतु, त्यांच्या प्रश्नावर कुणीच काही बोलताना दिसत नाही. 

ओवेसींनी भाजपसोबत समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, संपूर्ण देशातील धर्मनिरपेक्षतेला कमकुवत करण्यात भाजप गुंतली आहे. त्याचवेळी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस या पक्षांनी गप्प बसणे पसंत केले आहे. अल्पसंख्याकांच्या हिताबद्दल हे पक्ष काहीही बोलत नाहीत. या पक्षांनी मुसलमानांची मते घेतली पण त्यांच्यासाठी काही केले नाही. 

आमचा पक्ष उत्तर प्रदेशात केवळ विधानसभा निवडणुकीची तयारी करीत नाही तर एक चांगला पर्याय म्हणून समोर येणार आहे. उत्तर प्रदेशात 11 टक्के यादव आहेत. ते जर एक यादव मुख्यमंत्री बनवू शकत असतील तर 19 टक्के मुसलमान 19 मुस्लिम आमदारही बनवू शकणार नाहीत का? आजच्या घडीला केवळ मुस्लिमच नव्हे तर दलितांनाही लक्ष्य केले जात आहे, असेही ओवेसी यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com